
भंडारा पत्रिका/वार्ताहर जवाहरनगर : परिसरातील कोंढी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या आयुध निर्माणी कारखाना परिसराला लागून असलेल्या व कन्हान नदी किनाºयावरील पेवठा या गावातील शेतकरी व पशुपालक सोमा भवानी वंजारी यांचे बैल गावालगत शेतात जांबाचे झाडा शेजारी रात्र पाळीत बांधलेले होते. २३ फेब्रुवारी च्या पहाटे वाघाने बैलावर हल्ला करून घटनास्थळावरून ६० ते ७० फुटावर फरफकटत ओढून नेऊन ठार केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. यापूर्वी ४ फेब्रुवारी ला याच गावातील परसराम भाकरू मेश्राम यांचे दोन दुधाळू गाई व एक वासरू गावालगत शेतातील गोठ्यात रात्री पाळीत बांधलेले होते. यातील मोठ्या गाईवर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना घडली होती. एका महिन्यात दोन पाळीव प्राण्यावर वाघाने हल्ला करून ठार केले असल्याने गावात व परिसरात या वाघाविषयी दहशत निर्माण झाली आहे.
या घटनेची माहिती पशुपालक यांनी पोलीस पाटील चंद्रभान हटवार यांना दिले, त्यांनी या घटनेची माहिती जवाहरनगर पोलीस व भंडारा वनविभाग यांना दिले. लगेच घटनास्थळी जवाहरनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार भिमाजी पाटील व भंडारा वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही.के. बेलखेडे यांचे मार्गदर्शनाखाली वन क्षेत्र सहाय्यक ए. डी.वासनिक, बीट रक्षक शहापूर चे शिरीन शेख, जिवशास्त्रज्ञ शुभम मोदनकर, जलद बचाव पथक वनविभाग भंडारा येथील शरद ताईतकर, अविनाश नागपुरे, शशांक तुरस्कर, अमोल नागरिकर, नरेंद्र उरकुडकर, उमेश वाढीवे, जि. प.सदस्य, प्रेम वणवे, पोलीस पाटील चंद्रभान हटवार, पशु वैद्यकीय अधिकारी सातोना चे नाकाडे यांनी घटनास्थळी मृतक बैलाचे शवविच्छेदन करून परिसरातील वाघाचे पायाचे मोठ्या आकाराचे पगमार्क (पायाचे ठस्से) आढळल्याने यावरून हा वयस्क मोठा वाघ असल्याचे निष्पन्न झाले असून घटना स्थळी वनविभाग भंडारा कडून ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. यामुळे या वाघाची पेवठा सह परिसरात नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.