
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : सदरमधील सेंट उसूर्ला पर- ीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेदरम्यान दोन विद्यार्थिनींकडे मोबाईल आढळून आल्यानंतर राज्यातील पहिले पेपर फुटीचे प्रकरण समोर आले. या प्रकरणात एका ट्युशन क्लासेसच्या संचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. निशिकांत मून (वय ४५, रा. मानकापूर) आणि फरहान अख्तर (वय २०, रा. कामगारनगर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपी निशिकांत मून हा एका ट्युशन क्लासेसचा संचालक असून त्याच्याकडे फरहान हा शिक्षक म्हणून काम करतो. निशिकांत मून याने शिक्षण विभागातील काहींना हाताशी धरुन बारावीचे पेपर लिक केल्याची शक्यता आहे. तसेच शिक्षक फरहान याने व्हॉट्सअपवर आलेल्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरे सा- ेडवलेली आहेत.
दोघांचेही मोबाईल जप्त करण्यात आले असून त्यांनी मोबाईलचा डाटा सर्व डिलिट केला आहे. त्यामुळे फॉरेंन्सिक लॅबमधून तपास केल्यानंतर पेपर लिक बाबत ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागणार आहे. दोघांनाही नागपुरातून अटक केली असून निशिकांत हा त्या ग्रूपचा अॅडमिन आहे तर फरहानने प्रश्नांची उत्तरे सोडवून मुलांसाठी उपलब्ध केली होती. पोलिस कोठडीत दोघांनाचीही कसून चौकशी करण्यात येणार आहे. त्यानंतरच या पेपर फुटीच्या प्रकरणात आणखी किती आरोपी आहेत, याचा तपास करण्यात येणार आहे.गुरुवारी सेंट उसूर्ला परीक्षा केंद्रावर बारावीचा केमेस्ट्रीचा पेपर होता. एक विद्यार्थिनी प्रसाधनगृहात जात असल्यामुळे पर्यवेक्षकाला संशय आला. महिला शिक्षिकेने तिची झडती घेतली असता स्मार्टफोन आढळून आला. मोबाईलमधील एका व्हॉट्सअप ग्रूपमध्ये पेपर सुरु होण्यापूर्वीच पेपर आणि त्याची उत्तरे येत होती. त्यावरुन पेपर तासाभरापूर्वीच फुटल्याचा संशय पर्यवेक्षकांना आला.
मोबाईलमधील व्हॉट्सअप ग्रूपवर त्याच परीक्षा केंद्रावर दुसरी विद्यार्थिनीसुद्धा होती. त्यामुळे दोन्ही विद्यार्थिनींकडून मोबाईल काढून घेतले आणि त्यांना परीक्षा देण्याची परवानगी दिली. पेपर फुटल्याची माहिती परीक्षा केंद्रावरील सर्व शिक्षकांपर्यंत पोहचली. कुजबुज सुरु असतानाच परीक्षा केंद्रावर सुरक्षेसाठी नियुक्त असलेल्या पोलिस कर्मचाºयांलाही कुणकुण लागली. त्याने लगेच आपले वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमोल देशमुख यांना माहिती दिली. पीआय देशमुख ताफफ्यासह परीक्षा केंद्रावर पोहचले.त्यांनी मोबाईल तपासला असता त्यात १५ जणांच्या व्हॉट्सअप ग्रूपवर प्रश्नपत्रिका आणि उत्तरे असल्याचे दिसले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. मात्र, सेंट उसूर्ला शाळेतील शिक्षकांनी शाळेची बदनामी आणि विद्यार्थिनींच्या भविष्याचा विचार करता गुन्हा दाखल होऊ नये म्हणून प्रयत्न केले. मात्र, पीआय देशमुख यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांंनी परीक्षा बोर्डाच्या अध्यक्षांना माहिती देऊन पडताळणी करुन घेतली. त्यानंतर थेट गुन्हा दाखल केला.