पुजारीटोला कालव्यात बुडून तरुणाचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात पुजारीटोला धरणाच्या कालव्यात आंघोळ करायला गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. गौरव फंदुलाल मडावी (२५, रा. मंदीटोला, तालुका सडक अर्जुनी), असे मृत तरूणाचे नाव आहे.गौरव मडावी हा सालेकसा तालुक्यात बिजेपार येथे त्याचा मावशा जियालाल मडावी यांच्या तेरावी (देवकारण) कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी आला होता. रविवारी दुपारी रायपूर येथील हर्ष श्रावण कोडापे (२४) आणि बिजेपार येथील कैलास दयाराम मडावी (३४) यांच्या सोबत गौरव मडावी हा पुजारीटोला धरणाच्या कालव्यात आंघोळ करायला गेला होता. त्याचा तोल गेला आणि तो कालव्यात वाहून गेला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *