जनावरांची वाहतूक करणाºया ३ पिकअप वाहनांवर कारवाई

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यातून अवैधरित्या गोवंशीय जनावरे कत्तली करिता जात असल्याचे माहिती मिळाल्यावरून तिरोडा पोलिसांचे दोन दलाने कार्यवाही करून तीन वाहनांसह १५ जनावरे असा एकूण १९ लक्ष ५५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून चार जणां विरुद्ध गुन्हे नोंद केले. २२ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता दरम्यान तिरोडा पोलिसांना एका हिंदूवादी संघटनेने दिलेले माहितीनुसार कवलेवाडा येथे दोन पिकअप वाहनातून गोवंशीय जनावराची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक अमित वानखडे यांचे आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय मसराम, हवालदार नामुरते, शिपाही अमित कुमार माहुले ,चालक पोलीस शिपाई कोरे यांनी कवलेवाडा गाठून पाहणी केली असता तेथे महिंद्रा बोलेरो कंपनीचे मालवाहक वाहन क्रमांक एम एच ३५ ए जे २०४० , तसेच टाटा एस कंपनीचे एम एच ४१३६ अशी दोन वाहने उभी असून दोन्ही वाहनात पाच पाच गोवंशीय जनावरे दाटीवाटीने कोंबून त्यांची चारा पाण्याची कुठलीही व्यवस्था न करता वाहतूक करीत असल्याचे दिसले.

दोन्ही वाहनाचे चालक लखन पोतन दोनोडे व हेमराज पैकी रहांगडाले दोघेही रा. धापेवाडा यांना जनावरे वाहतुकीचा परवाना व जनावरांचे वैद्यकीयप्रमाणपत्र मागितली असता त्यांनी आपल्याकडे असे कुठलेही कागदपत्र नसल्याचे सांगितले. त्यावरून दोन्ही वाहनांसह आरोपींना पोलीस स्टेशन तिरोडा येथे नेण्यात आले. तिरोडा पोलिसांना याच दिवशी रात्री १०वाजता दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीवरून तालुक्यातील परसवाडा येथून एका पांढºया रंगाचे पिकअप वाहनातून अवैधरित्या गोवंशीय जनावराची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस स्टेशन तिरोडा समोर उप पोलीस निरीक्षक तेजस कोंडे शिपाही महेंद्र अंबादे चेतन फुले यांनी सापळा रचून पोलीस स्टेशन समोरून चार चाकी वाहन एम एच ३५ ए जे २५१८ नागपूरकडे जात असताना थांबवून वाहनाची पाहणी केली असता वाहनाचे डाल्यात पाच गोवंशीय जनावरे अवैध्यरित्या चारापाणी पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता दाटीवाटीने कोंबलेली दिसून आल्याने दोन्ही वाहन चालकास जनावरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र व वाहतुकीचा परवाना बाबत विचारणा केली असता त्यांने आपल्याकडे असा कुठलाही परवाना नसून आपले नाव सुमित देवानंद उईके राहणार परसवाडा व ही जनावर गंगादास अंधारीलाल बंभारे राहणार महालगाव यांचे असल्याची सांगितल्यावरून दोन्ही प्रकरणात चार आरोपीतांविरुद्ध तिरोडा पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे प्राण्यांच्या प्रतिबंधक अधिनियम १९६० चे कलम ११(१) (ड) )(ई)सहकलम महाराष्ट्र पशुसंवर्धन अधिनियम १९७६ चे कलम ५ ,६ ,९, नुसार गुन्हा नोंद करून तीन वाहन व १५ जनावरे असा एकूण १९ लक्ष ५५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून कारवाई केली .

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *