घरगुती सिलेंडरचा व्यवसायाकरीता उपयोग करणाºया तिघांवर कारवाई,४ सिलेंडर जप्त

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : सध्या आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे काही प्रमाणात गॅस पुरवठा कमी होत असला तरी शासनातर्फे घरगुती वापराचा गॅस पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात येत आहे. मात्रे तरी घरगुती गॅस सिलेंडरचा अवैधरीत्या व्यवसायाकरिता वापर होत असल्याने तहसीलदार तिरोडा एन. एम. ठाकरे यांचे पथकाने दिनांक १२ मार्चपासून उघडलेल्या मोहिमेत आज दिनांक १३ मार्च रोजी तिरोडा शहरातील प्रेम फॅमिली हॉटेल येथून एक सिलेंडर, वैशाली राजपुरोहित येथून एक सिलेंडर व मंगेश बरीयेकर कडून दोन असे एकूण ४ घरगुती वापराचे गॅस सिलेंडर जप्त केले. ही कार्यवाही तहसीलदार नियम ठाकरे यांचे मार्गदर्शन निरीक्षण अधिकारी मनोज राऊत, पुरवठा निरीक्षक दिगंबर गव्हाणे, लिपिक पंकज जनबंधू , परिचर अश्विन वासनिक यांचे पथकाने केली. तालुक्यात घरगुती वापराचा गॅस सिलेंडरची कुठलीही अडचण नसून नागरिकांनी भीती बाळगू नये तसेच घरगुती वापराचे सिलेंडरचा गैरवापर करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *