राष्ट्रवादीचे युतीमुळे नगरपरिषद तिरोडाचे उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्यांची निवडणूक बिनविरोध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : आज दिनांक १६6 जानेवारी रोजी नगरपरिषद तिरोडाचे उपाध्यक्ष व स्वीकृत सदस्य निवडणुकी करिता नगराध्यक्ष अशोक असाटी यांनी बोलावलेले सभेत राष्ट्रवादी व भाजपची युती असल्याने दोन स्वीकृत सदस्य व उपाध्यक्षांची निवड बिनविरोध झाली. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद तिरोड्याच्या निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्ष अशोक साठी व सदस्यांची कार्यकाळाची पहिली सभा आज दिनांक १६ जानेवारी रोजी नगरपरिषद तिरोडाची सभागृहात नगराध्यक्ष तथापिठासीन अधिकारी अशोक असाटि यांचे अध्यक्षतेत सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती

या सभेत दोन स्वीकृत सदस्य व उपाध्यक्ष पदाची निवडणूक असताना या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची युती कायम असल्याने स्वीकृत सदस्य पदा करता दोन्ही पक्षातर्फे एक एकच नाव आल्याने भारतीय जनता पक्षाचे स्वीकृत सदस्य म्हणून संजय बैस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय सिंह गौर तर उपाध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश गुनेरिया यांचा एकमेव अर्ज आल्यावरून त्यांची ही बिनविरोध निवड झाल्याची घोषणा पिठासीन अधिकारी अशोक असाटि यांनी जाहीर केली. आमदार विजयकुमार रहांगडाले यांनी या नवनियुक्त उपाध्यक्ष राजेश गुनेरिया, अजित सिंह गौर, संजय बैस यांचे अभिनंदन करून तिरोडा नगर परिषदेत सर्वच सदस्यांना सोबत घेऊन नगर विकासाची कामे करून तिरोडावासीयांनी भाजप राष्ट्रवादी अजित पवार गटावर दाखवलेला विश्वास सार्थक करू असे सांगितले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *