तुमसर नगर परिषद उपाध्यक्षपदी सचिन बोपचे

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : नगरपालिकेत युवा नेतृत्वाची नवी ऊर्जा पाहायला मिळत आहे. भाजपाच्या पूर्ण पाठिंब्याने सचिन बोपचे यांची नगर परिषद उपाध्यक्ष म्हणून निर्विरोध निवड करण्यात आली आहे. आमदार डॉ. परिणय फुके यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, ज्यामुळे नव्या नेतृत्वाची गरज आणि महत्त्व अधोरेखित झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सज्जू शेख यांच्यासह अनेक नगरसेवक उपस्थित होते आणि त्यांनी युवा उपाध्यक्षाचे स्वागत उत्साहात केले. नेतृत्वामुळे नगरपालिकेतील विकास, स्वच्छन, सामाजिक उपक्रम आणि जनकल्यागाच्या योजनांना नव्या गतीने सुरुवात होईल, असा विश्वास सर्वांमध्ये निर्माण झाला. विशेषत: शहरात युवकांमध्ये नेतृत्व करण्याची आवड आणि सामाजिक बांधिलकी चाढविण्याचा प्रयत्न यामध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.

शहरातील नागरिकांनीही या निवडीवर समाधान व्यक्त केले. नगरपालिकेतील युवा नेतृत्वाचे संतुलन साधल्यामुळे आगामी काष्ठात तुमसर शहराच्या सर्व क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी अधिक वाढली आहे. १६ जानेवारी २०२६ नगर परिषद तुमसरच्या उपाध्यक्ष पदाची निवडणूक नगराध्यक्ष सागर गभने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सदर निवडणूक प्रक्रियेत उपाध्यक्ष पदासाठी एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्याने सचिन बोपचे यांची उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाल्याचे पिठासीन अधिकाºयांनी जाहीर केले. नियोजित कार्यक्रमानुसार नगर परिषद सभागृहात सभा आयोजित करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नामनिर्देशन, छाननी व निवड करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

याच बैठकीत नगर परिषदेसाठी नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती देखील करण्यात आली. त्यानुसार भारतीय जनता पक्षाकडून शैलेश मेश्राम व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून हितेश चोपकर तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून प्रमोद तीतीरमारे यांची नगर परिषदेचे नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तदनंतर पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा यांनी नवनियुक्त उपाध्यक्ष, सर्व नगरसेवक तसेच स्विकृत सदस्य यांचे सत्कार केले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्या दिल्या. सदर निवडणूक व बैठक मुख्याधिकारी करणकुमार चव्हाण तसंच नगर परिषदेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *