गोंदिया शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचा रोहित पवार यांचे अन्नत्याग आदोलनास पाठिंबा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये घालण्यात आलेल्या जाचक अटी रद्द करून शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी आमदार रोहितदादा पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा दर्शवित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गोंदिया जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे निवेदन सादर करण्यात आले. माजी खासदार खुशालचंद्र बोपचे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन शासनाने शेतकरीविरोधी जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात व सर्व पात्र शेतकºयांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष सौ. मेघाताई बिसेन, जिल्हा सरचिटणीस अजित नायर, जिल्हा सरचिटणीस नासिर घाणीवाला, युवक जिल्हाध्यक्ष गणेश पारधी, महिला तालुकाअध्यक्ष सौ. मंदाताई टेंभरे, व्ही. टी. पटले सर, माजी सरपंच प्रकाश पटले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव उपस्थित होते. शेतकºयांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) सातत्याने संघर्ष करत असून शेतकºयांना न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील, अशी भूमिका यावेळी पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *