
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तालुक्यात होत असलेले अवध्य रेती वाहतुकीवर आळा बसण्या करिता तहसील दार तिरोडा यांनी गस्ती पथक तयार केले असून आज दिनांक १६ रोजी अवध्यरित्या दोन वेळा सूर्य तिची वाहतूक करणारा क्र पकडून ट्रक मालकाकडून दंड वसूल केला.
तहसील कार्यालय तिरोडा कडून मिळालेले माहितीनुसार आज दिनांक १६ जानेवारी रोजी सकाळी तहसीलदार नारायण ठाकरे यांची गस्ती पथकातील करती येथील तलाठी सचिन राऊत परसवाडा तलाठी पारधी महसूल सेवक संजय पटले गोड मोहाडी परिसरात गोष्टीवर असताना त्यांना गोड मोहाडीकडून सोनेगाव मार्गाने जात असलेला मिनी ट्रक क्रमांक एम एच ३५ / १० १० रेती घेऊन जात असल्याचे दिसल्यावरून हा ट्रक थांबवून ट्रक चालक नरेंद्र सदाशिव कोलारे यास त्याचे नाव गाव विचारले असता यांनी आपण सहसपूर येथील रहिवासी असून हा ट्रक कारु भदाडे एकोडी यांचा असून आपल्याकडे रेती वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे सांगितल्यावरून महसूल पथकाने हा ट्रक ताब्यात घेऊन तहसील कार्यालय तिरोडा येथे जमा करून तहसीलदारांनी सदर प्रकरण पुढील कारवाई करता उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयाकडे पाठवल्या वरुन उपविभागीय अधिकारी पूजा गायकवाड यांनी सदर विनापरवाना रेती वाहतूक करणारे ट्रक वर १ लक्ष ४७ हजार ७६६ रुपयाचा दंड ठोठावल्याने सदर ट्रक मालकांनी हा दंड भरल्या वरून सदरचा ट्रक सोडण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे.