धान खरेदी मर्यादा १० लाख क्विंटलने वाढवा

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी अर्जुनी मोरगाव : विधानसभा मतदारसंघातील शेतकºयांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार राजकुमार बडोले यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची मुंबई येथील मंत्रालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान बडोले यांनी खरीप हंगाम २०२५-२६ मध्ये धान उत्पादनात मोठी वाढ झाल्याने शेतकºयांना किमान आधारभूत किंमतवर धान विक्रीसाठी अतिरिक्त १० लाख क्विंटल खरेदी मर्यादा मंजूर करणे आणि मका खरेदी प्रक्रिया वेगवान करण्यासाठी खाजगी गोदामे भाडेतत्त्वावर उपलब्ध करून देण्याची मागणी पत्रातुन केली आहे अर्जुनी-मोरगाव, सडक अर्जुनी आणि गोरेगाव या तीन तालुक्यात खरीप हंगामात धानाचे उत्तम उत्पादन झाले आहे. सरासरी ३८ क्विंटल प्रति हेक्टर इतके उत्पन्न नोंदवले गेले आहे.

मात्र, सध्याची खरेदी मर्यादा अपुरी पडल्याने अनेक शेतकºयांना एमएसपी दरात धान विकता येत नाही. परिणामी शेतकयांना खासगी व्यापाºयांकडे कमी दराने विक्री करावी लागत आहे. त्यामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर आ. बडोले यांनी मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून आणि त्यांची मंत्रालयात भेट घेऊन अतिरिक्त १० लाख क्विंटल धान खरेदी मर्यादा तातडीने मंजूर करण्याची विनंती केली आहे. सध्याची मर्यादा वाढवल्यास शेतकºयांना आधारभूत किमतीचा लाभ मिळेल आणि त्यांचे आर्थिक नुकसान टळेल, असे बडोले यांनी पत्रात नमूद केले आहे. दुसºया पत्रात अर्जुनी-मोरगाव आणि सडक अर्जुनी तालुक्यातील मका उत्पादक शेतकºयांच्या अडचणींकडे लक्ष वेधत या भागात मोठ्या प्रमाणात मका उत्पादन होते. मात्र शासकीय गोदामांची उपलब्धता आणि क्षमता अपुरी पडल्याने खरेदी प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू आहे. यामुळे शेतकºयांना मका कमी दरात विकावी लागत आहे. शासकीय गोदामे अपुरी पडत असल्याने खाजगी गोदामे भाडेतत्त्वावर घेऊन खरेदी प्रक्रिया वेगवान करण्यात यावी, अशी तातडीची मागणी आमदार बडोले यांनी केली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *