
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : बिरसी तिरोडा मार्गावरील लोधीटोला वळणाजवळ भरधाव चार चाकी वाहनाने समोरून येणाºया मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने मोटार सायकलस्वार दोन युवकांचा मृत्यू झाला. १० जून रोजी रात्री ८ वाजता दरम्यान तिरोडा येथून आपले दुचाकी क्रमांक एम एच ३५ ए झेड ०५७४ होंडा डीलक्सने डबल सीट जात असलेले मलपूरी येथील युवक सौरभ उमेश बघेले २६ व शिवम चुन्नीलाल अंबुले २२ वर्ष यांना समोरून भरधाव वेगात आलेले स्विफ्ट क्रमांक एम एच ३५ ए जी २७८५ ने जबरदस्त धडक देऊन सुमारे ५० फूट लांब पर्यंतफरफटत नेले. त्यात मोटार सायकलचा चुराडा होऊन मोटार सायकल चालक सौरभ बघेले याचा जागीच मृत्यू झाला तर मागे बसलेलाशिवम चुन्नीलाल अंबुले २२ वर्ष हा गंभीर जखमी झाल्याने त्यास त्वरित उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे नेले असता प्रथमोपचार करून पुढीलउपचारा करिता गोंदियाकडे नेत असतांना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला.
नितेश उमेश बघेले यांचे तक्रारी वरून तिरोडा पोलीस स्टेशन येथे स्विफ्ट कार चालका विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २८१, १०६ (१) सहकलम मोटर वाहन कायदा १८४, १३४ (अ) (ब) नुसार गुन्हा नोंद करून घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका बैस करीत आहेत. आज दिनांक ११ रोजी दोन्ही युवकांचे उपजिल्हा रुग्णालय तिरोडा येथे शव विच्छेदन करून प्रेत नातेवाईकांचे स्वाधीन दिल्यावरून मलपुरी स्मशान घाटावर दोन्ही युवकांनवर अंतिम संस्कार करण्यात आले.