सहावा आरोपीही अटकेत आर्थिक दुर्बल कुटुंबातील बालकांची डॉक्टरांकडून विक्री : पोलीस अधीक्षक हसन

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : उपचाराच्या नावाखाली बाळाची विक्री करण्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी आज ६ व्या आरोपीला भंडारा पोलिसांनी अटक केली. बाळाची खरेदी करणाºया पांढराबोडी येथील मालती वाघमारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दरम्यान हे एक प्रकारचे बाळ विक्रीचे रॅकेट असून दोन पेक्षा अधिक बाळांची विक्री झाल्याचा संशय असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषदेत दिली. गोंदिया येथील न्यू बालाजी हॉस्पिटलचे संचालक डॉ नितेश बाजपेयी मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ विक्री प्रकरणाचा उलगडा २ फेब्रुवारी रोजी झाला होता. याप्रकरणी ६ फेब्रुवारीला वरती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

संपूर्ण प्रकरणाचा तपास करीत असताना पाच जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली होती. विक्री करण्यात आलेले दोन बाळ पोलिसांनी हस्तगत केले होते. दरम्यान २ फेब्रुवारी रोजी उघड झालेल्या प्रकरणात ज्या महिलेने बाळ खरेदी केले होते, त्या भंडा-रा जिल्ह्यातील पांढराबोडी येथील मालती वाघमारे यांनाही आज २३ रोजी भंडारा पोलिसांनी अटक केली. त्यामुळे बाळ विक्री प्रकरणातील आरोपींची संख्या आता सहावर पोहोचली आहे. दरम्यान या अनुषंगाने आज जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. डॉक्टर नितेश बाजपेयी हा आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि विवाहबाह्य संबंधातून जन्मास आलेल्या बालकांच्या विक्रीचे व्यवहार करायचा, तशी टोळी त्याने तयार केली असावी, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. डॉक्टरच्या वैद्यकीय पदव्या संदर्भातही तपासणी सुरू असून संबंधित विभागाशी पत्रव्यवहार केल्या जात असल्याचे ते म्हणाले.

ज्यांनी ज्यांनी या प्रकरणात डॉक्टरांना मदत अशा प्रत्येकाला तपासा दरम्यान काही गोष्टी आढळल्यास आरोपी करण्यात येईल असेही ते म्हणाले. ज्या अनुषंगाने लोकांना काही माहिती असल्यास ते पोलिसांना द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. या प्रकरणाचा सर्वदृष्टीने तपास केला जाईल असेही पोलीस अधीक्षक नुरुल हसन म्हणाले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *