
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी नागपूर : ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून आज महावितरणने ‘आपली जमीन, आपले भविष्य’ या मंत्राचा उच्चार करत एका शाश्वत आणि हरित भविष्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला आहे. महाराष्ट्राच्या विकासाची ऊर्जा असलेल्या महावितरणने आता केवळ वीजपुरवठा करण्यापलीकडे जात, पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘हरित ऊर्जा, समृद्ध महाराष्ट्र’ हे ध्येय गाठण्यासाठी महावितरण आता संपूर्ण क्षमतेने सज्ज झाली आहे. शाश्वत ऊर्जेची नवी पहाट: महावितरणने ऊर्जा परिवर्तनाची मोठी लाट आणली आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत आतापर्यंत सुमारे दोन हजार कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण पूर्ण झाले असून, त्यातुणराज्यातील तब्बल १० लाखांहून अधिक शेतकºयांना दिवसा वीजपुरवठा उपलब्ध झाला आहे. या योजनेमुळे केवळ शेतकºयांचे जीवन सुखकर होत नाहीये, तर ६५ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून ग्रामीण भागात ७० हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत. सौर ऊर्जेच्या या महासंवादात सामान्य नागरिकही मागे नाहीत: ‘प्रधानमंत्री सूर्यघर – मोफत वीज योजने’द्वारे राज्यातील ६ लाख १६ हजारांहून अधिक घरांवर छतावरील सौर प्रकल्प (फङ्मङ्मा३ङ्मस्र रङ्म’ं१) कार्यान्वित झाले आहेत, ज्यामुळे अनेकांचे वीजबिल आता ‘शून्य’ झाले आहे. याशिवाय, देशात सर्वाधिक १० लाखांहून अधिक सौर कृषिपंप कार्यान्वित करून महावितरणने एक नवा उच्चांक गाठला आहे.