सायबर गुन्हेगाराच्या घशातून काढले ६ लाख परत

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाºया एका सायबर टोळीचा नागपूर पोलिसांनी उरडगाड केला. ग्रोथ इंडिया रिसर्च इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नावाने फफसवणूक करणाºया दोन आरोपींना मध्यप्रदेशातील इंदूर शहरातून अटक करण्यात आली असून, पोलिसांनी तक्रारदाराचे जवळपास ६ लाख रुपये परत मिळवून देण्यात यश मिळवले आहे. माहितीनुसार, १८ नोव्हेंबर २०२५ रोजी नागपूर सायबर पोलिस ठाण्यात एका तक्रारदाराने फफसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींनी ग्रोथ इंडिया रिसर्च इन्व्हेस्टमेंट कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून तक्रारदार व त्यांच्या सहकाºयांना गुंतवणुकीवर मोठ्या नफ्याचे आमिष दाखवले. विश्वास संपादन करण्यासाठी आरोपींनी बनावट ईमेल देखील पाठवले होते. या आमिषाला बळी पडून फिर्यादींनी आरोपींनी सांगितलेल्या बँक खात्यावर एकूण १३ लाख २७ हजार ३७६ रुपये जमा केले. मात्र, परतावा न मिळाल्याने आपली फफसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. गुन्हा दाखल होताच सायबर पोलिसांनी ज्या बँक खात्यांवर पैसे वळवण्यात आले होते, त्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. या तपासातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ७ ेब्रुवारी रोजी इंदूर येथून ब्रिजेश नामदेवभाई सूर्यवंशी (३७, बालदा कॉलनी, इंदूर) आणि दीपक सुभाषचंद्र अग्रवाल (४८, आनंदनगर, इंदूर) या दोन आरोपींना अटक केली.

आरोपी दीपक अग्रवाल हा बँक खाते उघडायला लावून त्यांची सर्व कागदपत्रे स्वत:कडे घेत असे. या खात्यांचा वापर करून तो फिर्यादीची रक्कम वळवून घेत होता आणि आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने त्या पैशांची विल्हेवाट लावत होता. या टोळीकडून आणखीही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आणि न्यायालयाच्या आदेशानुसार, फिर्यादीच्या बँक खात्यावर आतापर्यंत ५ लाख ९६ हजार ७१२ रुपये परत मिळाले आहेत. उरलेली रक्कम आणि या साखळीतील इतर आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत. सायबर गुन्हेगारांच्या घशातून पैसे परत आणणे कठिण असतानाही पोलिसांनी दोन सायबर गुन्हेगारांना अटक केली आहे, हे विशेष.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *