बाजार समितीच्या सचिवाचा महिला रोखपालावर विनयभंगाचा प्रयत्न

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासकीय वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. समितीचे सचिव अनिल भोयर यांनी एका महिला रोखपालासोबत अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण बाजार समितीच्या वतुर्ळात खळबळ उडाली असून महिला कर्मचाºयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजताच्या सुमारास घडली. तक्रारदार महिला रोखपाल शासकीय कामाच्या निमित्ताने चेकबुकवर सही घेण्यासाठी सचिवांच्या दालनात गेल्या होत्या. यावेळी सचिवांनी कामाचा बहाणा करत महिलेला दालनात थांबवून घेतले.

मी तुमच्यासाठी नेहमी चांगला विचार करतो, पण तुम्ही माझे न ऐकतादुसºयांचे ऐकता, असे म्हणत सचिवांनी पीडितेचा डावा हात पकडून तिला स्वत:कडे ओढले. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सचिवाचा उद्देश अत्यंत हीन दर्जाचा होता. त्याने पीडितेला मला किस करू दे, अशी मागणी करून तिच्या लज्जेचा भंग केला. यावेळी झालेल्या झटापटीत पीडितेच्या हातातील बांगड्या फुटल्या. तिने सचिवांचा हात झटकून बाजूला होण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने दालनाचे उघडे असलेले दरवाजे आणि खिडक्या तातडीने बंद करून महिलेला आत कोंडून दबावाचा प्रयत्न केला.

महिलेला दालनात बंद केल्यानंतर आरोपी सचिव तिच्या जवळ गेला. काघाबरता? काही होत नाही. माझे तुम्ही काहीच करू शकत नाही, अशा शब्दांत तिला धमकावू लागला. मात्र पीडितेने न डगमगता त्याला ठणकावून जाब विचारला आणि जोरजोराने ओरडण्यास सुरुवात केली. महिलेची आरडाओरड ऐकून कुणीतरी येईल, या भीतीने अखेर सचिवांनी दालनाचे दार उघडले आणि तेथून पळ काढला. याप्रकरणी पीडित महिला रोखपालाने दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी अपराध क्र. १०७/२०२६ व भारतीय न्यायसंहितेच्या कलम ७४, ७५ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुराव्यादाखल फुटलेल्या बांगड्या गोळा केल्या आहेत. दरम्यान, आरोपी सचिव अनिल भोयर यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून या प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *