तुमसर उपजिल्हा रुग्णालयात अस्थीरोग तज्ञ व हॅन्डीकॅप प्रमाणपत्र सुविधा सुरू

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : मेंहताब सिंग ठाकूर (माजी नगरसेवक व जिल्हा सचिव रा .कांग्रेस श. प गट) यांच्या पाठपुराव्यामुळे तुमसर उपजिल्हा रुग्णालयात अस्थीरोग तज्ञ व हॅन्डीकॅप (अपंगत्व) प्रमाणपत्राची सुविधा सुरू करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी जिल्हा रुग्णालय भंडारा येथील शल्य चिकित्सक डॉ. संदीप गजभिये यांना निवेदन दिले होते. त्यांच्या आश्वासनानुसार अखेर या मागणीला यश आले असून, ही बाब तुमसर तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची आहे.

दि. ५ मे २०२६ रोजी मेंहताब सिंग ठाकूर यांनी तुमसर उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन नव्याने रुजू झालेले डॉ. नाकाडे (हॅन्डीकॅप सर्टिफिकेट अधिकारी) यांच्याशी चर्चा केली. यानुसार, हॅन्डीकॅप प्रमाणपत्रासाठी दर महिन्याच्या पहिल्या व तिसºया मंगळवारी तपासणी केली जाणार आहे. तसेच, अस्थीरोग तज्ञ म्हणून डॉ. साकुरे यांची नियुक्ती करण्यात आली असून, ते रोटेशन पद्धतीने आठवड्यातून दोन दिवस रुग्णालयात सेवा देणार आहेत. मंगळवार व गुरुवार या दिवशी अस्थीरोग तपासणी होणार आहे. नागरिकांनी या शासकीय सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, मेंहताब सिंग ठाकूर यांनी डॉ. संदीप गजभिये यांचे आभार मानले आणि डॉ. नाकाडे, डॉ. साकुरे व डॉ. बालबुधे यांनी रुग्णांना चांगली सेवा द्यावी, अशी विनंतीही केली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *