विर्शी येथील हल्लेखोर बिबट्या अखेर जेरबंद

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील मौजा विर्शी येथे ५ वर्षीय कु. अंशिका काशीराम मिरी हिचा बळी घेणाºया हल्लेखोर बिबट्याला अखेर दिनांक ४ मे २०२६ रोजी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. १५ एप्रिल २०२५ रोजी घडलेल्या या हृदयद्रावक घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. योगेंद्र सिंग (उपवनसंरक्षक, भंडारा) व संजय मेंढे (सहाय्यक वनसंरक्षक, साकोली) यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. एस. आर. कटरे (वनपरिक्षेत्र अधिकारी, साकोली) यांनी वन्यप्राणी बचाव पथक व वनकर्मचाºयांच्या मदतीने सातत्याने राबविलेल्या मोहिमेला अखेर यश मिळाले. घटना दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास घडली होती.

मौजा विशीं (नियतक्षेत्र किन्ही) येथे मक्याच्या पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने छत्तीसगड राज्यातील बलौदा बाजार जिल्ह्यातील सुहेला येथील रहिवासी काशीराम मिरी यांच्या ५ वर्षीय मुलीवर अचानक हल्ला केला. या दुदैर्वी घटनेत अंशिकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे साकोली तालुक्यातील वीर्शी-सातलवाडा परिसरात तीव्र दहशत पसरली होती. या पार्श्वभूमीवर वनविभागाने तात्काळ मोहीम राबवत बिबट्याच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी संवेदनशील भागात ट्रॅप कॅमेरे बसवले. तसेच संभाव्य भ्रमणमार्गांवर ट्रॅप पिंजरे उभारण्यात आले. वन्यप्राणी बचाव दल, भंडारा-साकोली तसेच स्थानिक वनकर्मचाºयांनी अत्यंत संयम व दक्षतेने सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले.

या नियोजनबद्ध आणि शर्थीच्या मोहिमेमुळे अखेर ४ मे २०२६ रोजी हल्लेखोर बिबट्या ट्रॅपपिंजºयात अडकला. जेरबंद करण्यात आलेल्या बिबट्याला सुरक्षितपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले असून वनविभागाच्या या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहून वनविभागास सहकार्य करावे, तसेच वन्यप्राणी आढळल्यास तात्काळ हेल्पलाईन क्रमांक १९२६ किंवा ०७१८४-२५२२८३ वर संपर्क साधावा, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. एस. आर. कटरे यांनी केले आहे.नागरीकांनी वनविभागाचे अभिनंदन केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *