
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : काइनेट जिमच्या वतीने आयोजित महाराष्ट्र स्टेट पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत तुमसर येथील खेळाडू संतोष ब्रम्हानंद बंधाटे यांनी उल्लेखनीय कामगिरी करत मास्टर गटात सिल्व्हर मेडल तर सिनियर गटात बेंच प्रेसमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. या स्पर्धेत बेंच प्रेस आणि बारबेल कर्ल असे दोन प्रकार ठेवण्यात आले होते. राज्यभरातून अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला होता. मास्टर गटात १२ स्पर्धकांमध्ये संतोष बंधाटे यांनी ११० किलो बेंच प्रेस आणि ६० किलो बारबेल कर्ल असे एकूण १७० किलो वजन उचलून सिल्व्हर मेडल पटकावले. तसेच सिनियर ८३+ वयोगटातही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तिसरा क्रमांक मिळवला. संतोष बंधाटे हे अदानी पॉवर प्लांटमध्ये रळऋ (सिक्युरिटी) विभागात कार्यरत असून त्यांच्या या यशाबद्दल विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.
यामध्ये सिक्युरिटी हेड सूर्यकांत करचप, हरीश ख्यानी, प्रदीप यादव, धीरज जोशी यांच्यासह भंडारा जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. प्रकाश सिंग, अॅड. विजय गणेशे, जयंत गणेशे, सतीश बंधाटे, कमलेश दमाहे, संतोष बोहने, राजू बंधाटे, सत्यम नंदागवळी, योगेश कामळे, निलेश काटकर, अॅड. प्रमोद इलमे, मनोज शेंडे, डॉ. सुनील कापगते, संजय मते, महेंद्र वहिले, राकेश वासनिक, श्रीधर साखरवाडे आदींचा समावेश आहे. तसेच सचिन मेश्राम, अतुल रोडगे, तुमसर निधी बँकेचे अध्यक्ष अरविंद थोटे, प्रकाश उमरकर, शैलेश रोडगे, समीर वंजारी आणि अजय बाणासुरे यांनीही त्यांचे अभिनंदन केले. येणाºया जून महिन्यात रायपूर (छत्तीसगड) येथे होणाºया वेस्टर्न इंडिया पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत संतोष बंधाटे महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणार असून ते मास्टर गटात खेळण्यासाठी तयारी करत आहेत.