बारावी बोर्डाच्या परीक्षेत सरस्वती कनिष्ठ महाविद्यालयाची तृप्तीने केला तालुक्यात विक्रम

भंडारा पत्रिका/तालुका प्रतिनिधी मोहाडी : श्री.गुरुदेव चिंतामण बिसणे कन्या विद्यालय व सरस्वती महिला कनिष्ठ महाविद्यालय मोहाडी येथील विज्ञान शाखेची कु.तृप्ती विलास हातेल रोहा हिने १२ वी बोर्डाच्या परीक्षेत ८५ टक्के घेवून तालुक्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला . तसेच गणित विषयामध्ये १०० पैकी ९९ गुण घेऊन महाविद्यालयाचा व मोहाडी तालुक्याचा तसेच रोहा गावचा मान उंचावला आहे.तृप्तीच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.आई वडील शेतीच्या कामावर जावून आपला उदरनिर्वाह व मुलींच्या शिक्षणावर खर्च करतात.याची जाणीव तृप्ती ला असल्यामुळे जिद्द, चिकाटी,परिश्रम व संयम बाळगल्याने अत्यंत विपरीत परिस्थितीत शाळेतील सरांच्या मार्गदर्शनाखाली उत्तुंग यश प्राप्त केले.तृप्तीने आपल्या यशाचे श्रेय आई वडील व विषय तज्ञ शिक्षक यांना दिले.तृप्तीच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष अभिजीत आनंदराव वंजारी, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्या सुषमा अभिजीत वंजारी यांनी कौतुक केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *