
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पवनी : पवनी शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्रे आणि माकडांच्या दहशतीने नागरिक व व्यापारी त्रस्त झाले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी व्यापारी असोसिएशन पवनीच्या वतीने पवनी नगर परिषदेच्या नगराध्यक्षांना निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. व्यापारी असोसिएशनने निवेदनात नमूद केले आहे की, शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे कुत्रे भररस्त्यात पादचाºयांवर आणि दुचाकीस्वारांवर हल्ले करत आहेत. विशेषत: लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण पसरलेआहे. कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या अनेक घटना शहरात घडल्या असून, यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.