गर्रा-बघेड़ा क्षेत्रात चक्रीवादळासह पावसाची हजेरी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गर्रा-बघेड़ा : तुमसर तालुक्यातील गर्रा- बघेड़ा परिसरात सायंकाळच्या सुमारास चक्रीवादळासारखे वादळी वारे आणि पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक बदललेल्या हवामानामुळे काही काळ नागरिकांची धावपळ उडाली, तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. दुपारनंतर आकाशात काळे ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार वाºयासह पावसाला सुरुवात झाली. वादळी वाºयांमुळे झाडांच्या फांद्या तुटून पडल्याचे तसेच काही ठिकाणी वीजपुरवठाही काही काळ खंडित झाल्याचे सांगण्यात आले. शेतकरी आणि व्यापाºयांनी आपल्या मालमत्तेची सुरक्षितता राखण्यासाठी तत्काळ खबर- दारी घेतली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही घट झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, वादळी वाºयांमुळे काही ठिकाणी किरकोळ नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. हवामानातील या अचानक बदलामुळे परिसरातील शेतकºयांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. खरीप हंगामाच्या तयारीसाठी पाऊस लाभदायक ठरत असला तरी जोरदार वारे आणि अवकाळी स्वरूपाचा पाऊस पिकांसाठी धोकादायक ठरू शकतो, अशी चिंता काही शेतकºयांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रशासनाने नागरिकांना खराब हवामानाच्या काळात सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *