गोसीखुर्दच्या मुख्यअभियंतापदी अजय दाभाडे यांची नियुक्ती

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांची गोसीखुर्द प्रकल्पाच्या मुख्य अभियंता पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने नुकतेच याबाबत आदेश जारी केले आहेत. दाभाडे यांनी यापूर्वी विविध सिंचन प्रकल्पांवर काम केले असून त्यांना प्रशासकीय आणि तांत्रिक अनुभव आहे. अजय दाभाडे यांनी नांदेड पाटबंधारे मंडळात अधीक्षक अभियंता म्हणून काम केले आहे. विविध मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये त्यांनी जबाबदाºया सांभाळल्या आहेत. गोसीखुर्द प्रकल्प हा विदर्भातील महत्त्वाचा प्रकल्प मानला जात असून, या प्रकल्पाकडून शेतकºयांच्या सिंचनाच्या अपेक्षा जोडल्या गेल्या आहेत. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट ‘ असणाºया वैनगंगा -नळगंगा नदी जोड प्रकल्पाची जबाबदारी ही त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.त्यामुळे या प्रकल्पाच्या गतीशील अंमलबजावणीची जबाबदारीही त्यांच्याकडे आहे. नागपूर येथील सिंचन भवनातील कार्यालयात ते सध्या रुजू झाले आहे.विविध प्रकल्पातील अपूर्ण कामे पूर्ण करणे, कामांना गती देणे आणि सिंचन क्षमता वाढविणे हे दाभाडे यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असणार आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामांना अपेक्षित गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *