शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह महिला रुग्णालय सुरु होणार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या मागणीवर भंडारा येथील महिला रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्यात सुरु असलेला वाद आज संपुष्टात आला. या मुद्यावर आज वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या मुंबई येथील दालनात बैठक आयोजित करण्यात आली. सोबतच या मुद्यावर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांच्याशी सुद्धा चर्चा करण्यात आली. ज्यामुळे दोन्ही मंत्र्यांच्या पुढाकाराने हा वाद संपुष्टात आला. मंत्रीमहोदयांनी वरील दोन्ही मुद्यावर निर्देश दिले कि हयातीत असलेल्या इमारतीतच शासकीय महाविद्यालयासह महिला रुग्णालय सुद्धा सुरु करण्यात यावे आणि या करिता कसल्याही प्रकारे निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन दिले.

उल्लेखनीय असे कि आ. नरेंद्र भोंडेकर यांच्याद्वारे भंडारा येथील महिलांकरिता स्वतंत्र रुग्णालय व्हावे म्हणून वेळो वेळी आंदोलने करण्यात आले. ज्याचे फलित होऊन भंडाºयाला रुग्णालय महिला रुग्णालय मिळाले. ज्यावर ९५ कोटींचा निधी खर्च करून भव्य इमारत सुद्धा बांधण्यात आली. परंतु हि इमारत उभी होऊन सुद्धा हे रुग्णालय सुरु होऊ शकले नाही. या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात आले.ज्यामुळे भंडारा जिल्ह्यातील महिलांना हक्काचे रुग्णालय मिळू शकले नाही आणि वाद निर्माण होऊ लागला.

या करिता आ. नरेंद्र भोंडेकर यांनी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कडे बैठक लावण्याची विनंती केली. हि विनंती मान्य करीत आज मंत्रीमहोदयांच्या दालनात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत आम. भोंडेकर यांनी वरील दोन्ही मुद्यासंदर्भात मंत्रीमहोदयांना माहिती दिली. ज्यावर मंत्रीमहोदयांनी सकारात्मक उत्तर देत उपस्थित अधिकाºयांना यावर तत्काळ उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. तसेच उच्च अधिकाºयांची एक चमू पाठवून याच इमारतीत महिला रुग्णालय आणि महाविद्यालय कसे सुरु करता येईल याचा अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. सोबतच महिला रुग्णालयात कर्मचाºयांची नियुक्ती, उच्च शिक्षित चिकित्सकांसह चीकीत्साच्या आधुनिक व्यवस्थेवर लक्ष देण्याचे निर्देश दिले. सोबतच दोन्ही कामाकरिता विभागाद्वारे निधी कमी न पडू देण्याचे आश्वासन सुद्धा दिले. या बैठकीत वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, संचालक डॉ. गोलाईत मॅडम सह संबंधित विभागांचे प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *