वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने अर्जुनी मोरगाव तालुका हादरला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने वाढत असून, मागील चार दिवसांत तिसरी गंभीर घटना घडल्याने संपूर्ण तालुका हादरला आहे. तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या एका मजुरावर अस्वलाने अचानक जीवघेणा हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना आज ता. १२ रोज मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तीरखुरी सहवन क्षेत्र भाग क्रमांक ९ अंतर्गत नियत क्षेत्र क्रमांक ३ मधीते भरणोली जंगल परिसरात घडली. या घटनेत दिपक रतिराम गावळे (वय ४०) रा. भरणोली हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या केशोरी प्राथमिकआरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. घडलेल्या घटनेमुळे जंगलालगतच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परिस-रातील काही मजूर नेहमीप्रमाणे पहाटेच्या सुमारास जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेले होते. सकाळी तेंदूपत्ता गोळा करण्याचे काम सुरू असताना दाट जंगल परिसरातून अचानक अस्वल बाहेर आले आणि दिपक गावळे यांच्यावर हल्ला चढविला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. अस्वलाने गावळे यांच्या मांडीवर व शरीराच्या इतर भागांवर गंभीर जखमा केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या सोबत असलेल्या इतर मजुरांनी आरडाओरड करतमदतीसाठी धाव घेतली. मजुरांच्या आरडा ओरडी मुळे अस्वल जंगलाच्या दिशेने पसार झाले. त्यानंतर जखमी अवस्थेतील दीपक गावळे यांना सहकान्यांनी जंगलाबाहेर आणून तातडीने उपचारासाठी केशोरी आरोग्य केंद्रात दाखल केले. अजून त्यांच्या वर उपचार सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच गोठणगाव वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाकडून पंचनामा करण्यात आला असून परिसरातील नागरिकांनी जंगलात जाताना सतर्क राहावे, एकटे जाऊ नये तसेच वन्यप्राण्याचा वावर दिसल्यास तत्काळ वनविभागाला माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *