
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : रायपूर येथून एका काळ्या रंगाच्या महिंद्रा कंपनीच्या थार कारमधून विक्री करण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग ०६ वरून देवरी-कोहमारा मार्गे नागपूर येथे गांजा वाहून नेणारे वाहन स्थानिक गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारावर पकडले. या वाहनातून ३८ किलो ५०० ग्रॅम गांजा किंमत ५४ लाख ३० हजार रुपये जप्त करण्यात आला. ही कारवाई २४ मे रोजी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वात गोंदिया येथील पोलिस पथक हे सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून पोलिस स्टेशन डुग्गीपार अंतर्गत येणाºया सौंदड परिसरात रविवारी (दि.२४) सौंदड रेल्वे उड्डाणपुलाजवळ राजवळ नाकाबंदी करीत असता काही वेळात रायपूरकडून एका काळ्या रंगाच्या महिंद्रा कंपनीची थार कार येताना दिसली; परंतु नाकाबंदी बघून ही कार विरुद्ध दिशेच्या रस्त्याने पळून जाऊ लागले. तेव्हा पोलिस पथकाने या कारचा पाठलाग करून आरोपीस वाहन थांबविण्यास भाग पाडले.
वाहन थांबताच कारमधून तीन व्यक्ती जंगलाच्या दिशेने पळू लागले असता पथकाने त्यांचा पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले व तिसरी व्यक्ती ही अंधाराचा व झुडुपी जंगलाचा फायदा घेऊन पळून गेली. दोन्ही व्यक्तींना वाहनाजवळ आणून वाहनाची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. कारच्या डिक्कीमध्ये व मधल्या भागाच्या सीटवर प्लास्टिक पोतडीमध्ये खाकी रंगाच्या टेपने गुंडाळलेले एकूण ४० बंडल दिसून आले. सदर बंडल उघडून पाहणी केली असता हिरवा ओलसर पाने, फुले आणि बिया (शेंडे व बोंडे) मिश्रित गांजा एकूण ३८ किलो ५०० ग्रॅम, हिरवा ओलसर गांजा किंमत ३८ लाख ५० हजार व गांजाची वाहतूक करण्याकरिता वापरलेली काळ्या रंगाची महिंद्रा कंपनीच्या थार किंमत १५ लाख रुपये व गांजा व्यवसायाक-ि रता वापरत असलेले ४ मोबाइल किंमत ८० हजार रुपये असा एकूण ५४ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
नागपूर येथे विक्रीसाठी नेत असल्याची दिली कबुली
विवेककुमार अश्विनीकुमार जोशी (वय २१, रा. डोंगरगड, ता. डोंगरगड, जि. राजनांदगाव (छ.ग.) व २) विधिसंघर्ष बालक, रा. नारायणगड चिचोला, ता. डोंगरगढ, जि. राजनांदगाव (छ.ग.) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी विवेककुमार अश्विनीकुमार जोशी याची चौकशी केली असता त्याने हा गांजा हा नागपूर येथे राहणारा सागर खोब्रागडे यास विक्रीकरिता घेऊन जात असल्याचे सांगितले. तसेच पळून जाणारी तिसरी व्यक्ती ही सुफियानर ऊर्फ सोफी रजा (वय २८, रा. रज्जानगर, डोंगरगड) येथील असल्याचे सांगितले. चारही आरोपींविरुद्ध पो.स्टे. डुग्गीपार येथे एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.