राज्य शासनाने शेतकºयांसाठी विकसित केलेल्या अ‍ॅप्सशी जिल्ह्यातील शेतकºयांनी अधिकाधिक जुळावे – जिल्हाधिकारी डॉ.मंगेश गोंदावले

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी गोंदिया : शेतीला पुरक हवामान अंदाज, शेतीतील पीक, कीड आणि विपणन याची परिपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तसेच भविष्यातील कोणत्याही नैसर्गिक आपत्तीची माहिती होण्यासाठी राज्य शासनाने शेतकºयांसाठी विकसित केलेल्या अ‍ॅप्सशी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकºयांनी जुळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा २०२६ बैठक सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे गुरुवारी पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री यांनी जलयुक्त शिवार अभियानातील कामांना गती देण्यात यावी. पावसातील संभाव्य खंड लक्षात घेता संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहणे आवश्यक असल्याने जलसंधारणाची कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले.

कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशनमुळे महाविस्तार अ‍ॅप, अ‍ॅग्रीस्टॅक, डीसीएस अ‍ॅप आणि क्रॉप सेफ यांसारख्या तंत्रज्ञानामुळे शेतकºयांना अचूक माहिती आणि सेवा उपलब्ध होणार आहेत. डिजिटल प्रणालीमुळे पीक विमा, अनुदान आणिविविध योजनांमध्ये पारदर्शकता वाढून पात्र शेतकºयांपर्यंत लाभ पोहोचवणे अधिक सुलभ होणार असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात शेती केवळ पाण्यावर अवलंबून राहणार नसून डेटा, ड्रोन आणि डिजिटल तंत्रज्ञान या तीन ‘डी’वर आधारित आधुनिक शेतीकडे वाटचाल सुरू झाली आहे. महाराष्ट्र हे कृषी क्षेत्रासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), जनरेटिव्ह एआय, ड्रोन आणि अ‍ॅग्रीस्टॅक धोरण लागू करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. महाविस्तार एआय, प्रणालीद्वारे हवामान, बाजारभाव, खतांची मात्रा, पीक सल्ला आणि कीड-रोग व्यवस्थापनाची माहिती शेतकºयांना उपलब्ध होत आहे. एआयच्या वापरामुळे उत्पादन खर्च २५ टक्क्यांनी कमी होईल.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *