बांध तलावाच्या जीवावर उठली गटार योजना

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया शहर दोन गटात विभागला आहे. रेल्वेच्या अलीकडे व पलीकडे शहराची रचना आहे. अशातच रेलटोली, रामनगर या परी सरात मागील वर्षभरापासून भुमिगत गटार योजनेचे काम सुरू आहे. यासाठी सुमारे २१३ कोटी रुपये मंजुर आहेत. अशातच रामनगर परिसरात सध्या या योजनेचे काम सुरू असून या कामावर बांध तलावाचे पाणी वापरण्यात येत आहे. तर दुसरीकडे बांध तलावातच सदर कंत्राटदाराने साहित्य निर्मिचे सामान ठेवले आहे.

परिणामी या तलावात मस्त्यमारी करणा-या व्यवसायीकांवरही संकट ओढावले आहे. एकंदरीत बांधकाम करणा-या कंपनीच्या हेकेखोर पणामुळे ही योजना बांध तलावाच्या जीवावरच उठल्याचा चित्र निर्माण झाले असून असाच प्रकार सुरू राहीला तर रामनगर, सुर्याटोला, रेलटोली, टीबीटोली व कुडवा परीसरात पिण्याचा पाण्याचे दुर्भीक्ष निर्माण होवु शकते. सविस्तर असे की, सुयार्टोला येथील बांध तलावात अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी स्व. सेवानिवृत्त मुख्याध्यापक सुर्यवंशी यांनी लढा दिला. परिणामी त्यांच्या लढयाला यश आले. व तलाव अतिक्रमण मुक्त करून जलसिंचन क्षमता वाढविण्यासाठी तलावातील गाळ उपसण्यात आली. शिवाय तत्कालीन आमदार गोपालदासअग्रवाल यांच्या पुढाकाराने तलावाला पर्यटनाचे स्वरूप मिळावे यासाठी तलावाचा विकास करण्यात आला. सुर्याटोला येथील बांधतलावाच्या माध्यमातून शहरातून जलस्त्रोत टिकून राहण्यात मोठी मदत होते. अशातच शहरात मागील काही वर्षापासून भुमीगत गटार योजनेचे काम सुरूआहे. रेलटोली परीसरातंर्गत रामनगर, सुर्याटोला, टिबीटोली, आदी परिसरात या योजनेचे काम सुरू आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत पिसी स्नेहल कंपनी अंतर्गत सुमारे २१३ कोटी रूपयांच्या निधीतून या योजनेचे काम होत आहे.

सध्या रामनगर परिसरात या योजने चे काम सुरू असून योजनेसाठी लागणारे पाणी बांध तलावातून आणण्यात येत आहे. विशेष म्हणजे यासाठी संबंधीत कंपनीने जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणतेही परवानगी घेतलेली नाही. दुसरीकडे बांधतलावातच साहित्य ठेवले आहे. त्यामुळे या तलावातील खुल्या जागेवर एक प्रकारे अतिक्रमण केले आहे. तर दुसरीकडे बांध तलावात काही मस्त्य व्यवसायिकसंस्था मस्त्य व्यवसाय करीत असतात. पण बीना परवानगी पाणी वापर होत असल्याने मत्स्य व्यवसायकांचा रोजगारावरही संकट निर्माण झाले आहे. एकंदरीत सदर कंपनी आपल्या मनमर्जीने कारभार करीत आहेत. तर काम करतांना सुरक्षेचा नियमांनाही तिलांजली देत असल्याने रस्त्यावरील अपघातात वाढ झाली आहे. परिणामी बांधतलावाच्या जीवावरच ही योजना उठल्याचे चित्र दिसून येत आहे परिणामी याचा फटका शहरातील नागरिकांना पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांध तलाव येथील पाण्याच्या विषयाला घेउन महाराष्ट जिवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता नरेश गणवीर यांना भम्रणध्वनीवर विचारले असता सध्या माज्याकडे वेळ नाही या विषयावर नंतर बोलू असे म्हणून माहिती देण्यास नकार दिला.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *