स्वयंपाकी महिला कामगारांवर मधमाशांचा हल्ला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेत सध्या क्रीडा सत्र सुरू आहे. आज शेवटच्या दिवशी २७ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० वाजे दरम्यान रात्री होणाºया सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्त खानावडीसाठी काम करणाºया कामगारांना मधमाशांनी चावा घेतल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मधमाशांनी चावा घेतलेल्यांमध्ये मध्ये केटरिंग साठी काम करणाºया महिला तसेच डेकोरेशन आणि फुल श्रृंगार सजावटीचे काम करणाºया अनेक पुरुषांचा समावेश होता. या बाबीची दखल घेत प्रशासनाने तातडीने लक्ष देत जिल्हा परिषदेतील स्थानिक डॉक्टरांनी जखमींना वेळीच गोंदिया येथील के.टी.एस ला जिला शासकीय रुग्णालयात औषध उपचार करून त्यांच्या बचाव केला.

या घटनेमुळे सायंकाळच्या सुमारास आयोजित केल्या जाणाºया सांस्कृतिक कार्यक्रमा च्या तयारीच्या कामात व्यत्यय आला होता. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद गोंदिया द्वारे क्रीडा सत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे यानिमित्त जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव-2026 सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षीस वितरण समारंभ आज २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद परिसरातील मोकळ्या जागेत आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान रात्रीच्या जेवणाची सोय करण्याकरिता कृष्णा केटरिंग चे कामगार आज सकाळपासूनच रात्रीच्या जेवणाची तयारीला लागले होते दरम्यान घटनास्थळी निर्माण झालेल्या धूर जिल्हा परिषदेतील इमारतीवर असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावर जाऊन भिडला असता, मधमाशांच्या एक पोळा फुटला आणि त्या ठिकाणी असलेल्या स्वयंपाकी महिला कामगार आणि पुरुषावर हल्ला चढविला. दरम्यान त्या ठिकाणी असलेले डेकोरेशनचे कामगार आणि इतरही उपस्थित आवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांनी केलेल्या या हल्ल्यात सीमा महेश उके (४१) रा. सुंदर नगर गोंदिया, अनुकना अशोक भौतिक (४३) रा. हलबीटोला, रेखा सुकराम उके (४०) रा.अजुर्नी , लक्ष्मी गणेश कावळे (४०) रा. टाकरी, लक्ष्मी संतोष वाघाळे (३५) रा.पांढराबोडी, पायल देशकर (४६)रा. कटंगी, राजेंद्र गणेश पुंडे (३८) रा. खातिया , देवेश देशमुख (२८)रा. जगनटोला, प्रदीप प्रल्हाद (२८)रजेगाव, रामराज वांदे (५०) रा.मालवा, पुष्पा मधु नागरीकर (५०) रा. कटंगी ,मनीष मेंढे (३८) रा. खातिया असे या घटनेतील मधमाशांच्या हल्ल्यात जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर गोंदिया येथील केटीएस शासकीय रुग्णालयात उपचार करून त्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *