जलसंपदा विभागाचे बेमुदत कामबंद आंदोलन ; कामकाज ठप्प

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- जिल्ह्यातील लिपिक संवर्गातील कर्मचाºयांनी १६ फेब्रुवारी पासून असहकार आंदोलन व दिनांक २३ फेब्रुवारी पासून कामबंद आंदोलन पुकारले होते. मात्र, शासनाकडून मागण्यांकडे लक्ष न दिल्यामुळे गुरूवारीही बेमुदत संप सुरू आहे. दरम्यान, जिल्ह्यात सोमवार पासून जलसंपदा विभागातील कर्मचाºयांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे जलसंपदा विभागातील शासकीय कार्यालयांचे कामकाज विस्कळीत झाले आहे. चौथ्या वेतन आयोगापासून वेतनत्रुटी दुरुस्त करून सुधारित वेतनश्रेणी लागू करावी, पदनामात बदल करावा, पदोन्नतीची साखळी कमी करावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी मागण्यांचा समावेश आहे. विशेषत ५ नोव्हेंबर २००५ पूर्वी अनुकंपा तत्त्वावरील प्रतीक्षा सूचीवर असलेल्या कर्मचा-यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या आंदोलनामध्ये जलसंपदा विभागातील गोंदिया पाटबंधारे विभाग गोंदिया, बाघ इटियाडोह पाटबंधारे विभाग गोंदिया, मध्यम प्रकल्प विभाग गोंदिया, उपसा सिंचन विभाग तिरोडा व इतर उप विभाग तसेच जलसंधारण विभागातील कर्मचारी सहभागी झाले आहेत. दरम्यान, आप आल्या कार्यालयासमोर कर्मचाºयांनी आंदोलन सुरु केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे जय महाराष्ट्र शासकीय व निमशासकीय अधिकारी व कर्मचारी संघटनेमध्ये उपस्थित जलसंपदा विभागातील कर्मचाºयांनी दिला आहे. या वेळी सौ संगीता गायधने अध्यक्ष जय महाराष्ट्र शासकीय कर्मचारी संघटना जलसंपदा विभाग गोंदिया यांचे नेतृत्वात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.

या आंदोलनात चंद्रशेखर वैद्य, टोपलाल हेमने, सुरेश रिधनार्थी, अमित मेंढे,विश्वजित बागडे, प्रशांत टेंभुरकर, महेंद्र ठाकरे, प्रीतम शहारे, सुनील भितर सौ. कल्पना मेश्राम, टेकन बिसेन, सपना जिभकाटे, सीमा लिल्हारे, विशाखा शहारे, बुलबुल दास, पटले, माधवी शहारे, करुणा ठाकरे, सुरेखा तिवारी, सपना पडोळे, परिणीता तुरकर, सविता हटवार, पठाण, संजय डोंगरवार, गोपाल भाजीपाले, प्रकाश सोनवणे, सुभाष कटरे, गजानन चौधरी, दीक्षित, जंघारे, जितेंद्र आदमने, भरत तूप्पट, राजेश बांगरे सुरेंद्र पटले, श्रीकांत मस्के, सोयाम, धन्याश्वर चवले, नितेश अंबाडे, मरकोल्हे, कुसरम, हलमारे, राऊत महेश साठवणे, प्रसुरामकर, नरेंद्र वाघमारे, वसंत राऊत, प्रार्थना भुजाडे, बावणे, डोंगरे सुधीर राऊत, सुधीर खोब्रागडे, संतोष शहारे, हिरापुरे, बरसागडे हे उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *