
यशवंत थोटे / भंडारा पत्रिका मोहाडी: हिन्दव: सोदरा:सर्वे न हिन्दू पतितो भवेत,मम दीक्षा हिन्दू:रक्षा मम मंत्र:समानता.संयोजक नारायण गोपीचंद धकाते,सहसंयोजक प्राणहंस मेहर कुशारी,गिता बालचंद गायधने, मनोज निमजे,शुभम माहूरकर, कोषाध्यक्ष धीरज श्याम चौधरी, व्यवस्था प्रमुख महेंद्र नारायण धकाते, सहव्यवस्था प्रमुख संजय गोन्नाडे यांच्या नेतृत्वाखाली आणि गुरुदेव सेवा मंडळ, लक्ष्मी मंडळ, माँ.चौण्डेश्वरी मंदिर कमेटी,हिंदुत्व समर्पण ग्रुप,मारोती मंदिर कमेटी, प्रजापिता ब्रह्मकुमारी,शिवगौरी भजन मंडळ,शारदा भजन मंडळ मोहाडीच्या यांच्या सहकार्याने रविवार दि.२२ फेब्रुवारी २०२६ ला दुपारी ३.३० ते ६.३० वाजता मोहाडी येथील गुरुवार बाजारात’संगठीत हिंदू-समर्थ भारत’ या उदात्त प्रेरणेने आपल्या परिसरात समस्त हिंदू समाजात एकता,बंधुत्व व सामर्थ्य निर्माण व्हावे या शुभ हेतूने विशाल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले.

दुपारी २.३० वाजता महादेव मंदिर(लोंढ्याचे)मोहाडी येथून आयोजक सुनिल कहालकर,भगवती निमकर,प्रियंका गायधने,यशवंत मोटघरे, रामदयाल पराते,रंजन ढोमणे, मिनाक्षी मोहतुरे,हेमलता दलाल,जया पराते,संतोषी मिश्रा,उमेश देशमुख, भूषण कुंभारे,रुपेश गाथे,सागर हेडाऊ,शिवम तलमले,उत्कर्ष दुबे, अमित चौधरी,हरिश डेकाटे, गोपाल सोनकुसरे,पलाश पाटील,संदिप मेहर यांच्या उपस्थितीत शोभायात्रा काढण्यात आली. विठ्ठल-रुखमाई मंदिर, इंदिरा गांधी चौक,ईमामवाडा चौक,श्री संत कबीर चौक,आंधळगाव रोड या मागार्ने मार्गक्रमण करीत गुरुवार बाजारात शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.प्रारंभी पालखीचे पूजन भगवती निमकर,सविता साठवणे, पूनम धकाते यांनी केले. भजन व सांस्कृतिक कार्यक्रम दुपारी ३.३० वाजता सुरवात झाली. नंदिता गोन्नाडे,प्रियांशी डेकाटे,ईरा कुंभारे यांनी एकच राजा इथे जन्मला यावर नृत्य प्रस्तुत केले.कनक गोन्नाडे, दीक्षा तरारे,रश्मी राजकुमार तरारे यांनी शिवाजी महाराजाच्या जीवनावर नृत्य प्रस्तुत केले.संत महात्म्यांचे आशीर्वचन सायंकाळी ५ वाजता ह.भ.प.रतन गडरिये दहेगाव यांचे संत आशीर्वचन झाले.सायंकाळी ५:३० वाजता प्रमुख वक्ते रा.स्व. संघाचे विदर्भ प्रांत संघचालक दिपकराव तामशेट्टीवार यांनी उद्बोधन केले. याप्रसंगी शिवगौरी भजन मंडळ मोहाडीच्या चमुनी सुंदर असे भारुड सादरीकरण केले.
यावेळी वासुदेवाच्या भूमिकेत वीणा कृष्णकुमार मारबते हे होते.सखू व जनाबाईच्या भूमिकेत दळण दळतानी वनिता रमेश पाटील, लता शिवशंकर गभने होते. तुळशीपूजा करतानी बबिता नंदकिशोर कनोजे तर शेतकरीच्या भूमिकेत सुषमा आनंदराव साखरवाडे,दळणकांडन करतानीच्या भूमिकेत विणा वसंता चिंधालोरे,आशा हिरालाल शेंडे यांनी भूमिका बजावली. गोटया खेळतानी गीता बालचंद गायधने,कविता विजय पडोळे. गवळनीच्या भूमिकेत आरती भाऊदास गायधने,माधुरी अरुण डोकरीमारे आणि बैलाच्या भूमिकेत कौतुका शरद रायकवाड यांनी वेशभूषा शिवगौरी महिला मंडळाच्या सदस्यांनी सुंदर असे बारा मिनिटाची भारुड सादरीकरण केले.प्रेक्षकांची मने जिंकली.हिंदू समर्पण ग्रुपच्या वतीने हनुमान चालीसा प्रस्तुत करण्यात आली. रोहना, बेटाळा,रोहा,दहेगाव पारडी,बोथली,खरबी,मोहगाव देवी,घाटकोरडा,पांजरा,कुशारी येथील २५ भजन मंडळांनी सहभाग नोंदवला होता.शिवगौरी भजन मंडळाच्या सदस्यकडून सायंकाळी ६.१५ वाजता भारत माता आरती करण्यात आली.प्रास्ताविक नरेंद्र निमकर यांनी केले.संचालन प्रशांत गायधने यांनी केले तर आभार प्रदर्शन विलास साठवणे यांनी केले.