भंडारा एसटी विभागातील सर्व बसस्थानके अद्यावत होणार

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा: बस प्रवाशांना सर्व प्रकारच्या अद्यावत सोई सुविधा मिळाव्यात यासाठी सर्व बसस्थानकांचे नूतनीकरण करणार व भंडारा एसटी विभागाला ८० अधिकच्या बस गाडया देणार असल्याचे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी काल बस प्रवाशांच्या गैरसोई व मागण्याचे निवेदन परिवहन मंत्र्यांना दिल्या भंडारा विभागात भंडारा, गोंदिया, साकोली, तिरोडा, तुमसर, व पवनी असे सहा आगार असून याठिकांनाहून लांब पल्याची व लोकल बस सेवा पुरविली जाते.

मात्र बसस्थानकांवर सोईसुविधा अभावी प्रवाशी बसने प्रवास करण्यास टाळतात. याकरीता सर्व बसस्थानके अद्यावत करुन भंडारा बस स्थानक विमानतळाप्रमाणे सुशोभित व अद्यावत करण्यात येणार आहे. व त्याकरीता ५०० कोटी रुपयांचा डिपीआर तयार करण्याचे निर्देश परिवहन मंत्र्यांनी दिल्याची माहिती आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली. बसप्रवासांच्या तुलनेत भंडारा विभागातील सर्व आगारांमध्ये बसेसची संख्या खुप कमी आहे. या संदर्भात नवीन बसेसची मागणी परिवहन विभागाकडे करण्यात आली होती. यामागणी नुसार भंडारा २०, गोंदिया १०, साकोली १५, तिरोडा १०, तुमसर १०, पवनी १५ अशा एकुण ८० नवीन बसेस भंडारा एसटी विभागाला मिळणार आहेत. बसने प्रवास करणाºया सर्व प्रवाशांना अद्यावत सोईसुविधा पुरवून अधिकाधिक प्रवाशांना बसने प्रवास करण्यासाठी आकर्षि केले जाईल. असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. आमदार नरेंद्र भोंडकर यांनी सुध्दा परिवहन मंत्र्यांचे आभार मानले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *