जंगलात लपवलेला माओवाद्यांचा शस्त्रसाठा हस्तगत!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया : नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सन २००५ पासून राबविलेल्या आत्मसमर्पण योजनेला मोठे यश मिळाले आहे. या योजनेअंतर्गत गोंदिया जिल्ह्यात तब्बल १४ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर त्यांच्या दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी जंगलात लपवलेला प्रचंड शस्त्रसाठा हस्तगत करून नक्षल चळवळीला मोठा धक्का दिला आहे. माओवाद्यांच्या एमएमसी झोनचा प्रवक्ता व एसझेडसीएम पदावर असलेला अनंत ऊर्फ विकास नवज्योत नागपुरे याने २८ नोव्हेंबर २०२५ रोजी त्याच्या १० साथीदारांसह, तसेच दरेकसा एरिया कमेटीचा कमांडर रोशन वेडजा याने १३ डिसेंबर २०२५ रोजी २ साथीदारांसह आत्मसमर्पण केले होते.

जीआरबी डिव्हिजन अंतर्गत दरेकसा एरिया कमिटीतील तब्बल १४ माओवाद्यांनी गोंदिया जिल्हा पोलिस दलासमोर शरणागती पत्करली होती. आत्मसमर्पित माओवाद्यांच्या चौकशीतून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे २५ जानेवारी २०२६ रोजी गोंदिया पोलिस दलाने मुरकूटडोह बेस कॅम्प अंतर्गत टाकेझरी-बेवारटोला डॅम परिसरातील जंगलात विशेष शोध मोहीम राबवली. या कारवाईदरम्यान माओवाद्यांनी भूमिगत करून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटकांचा मोठा डम्प यशस्वीरित्या हस्तगत करण्यात आला.

दरम्यान, गोंदिया जिल्ह्यात आत्मसमर्पित माओवाद्यांची सखोल चौकशी सुरू असून त्यांच्या माहितीच्या आधारे विविध जंगल परिसरात सतत शोध मोहिमा राबविण्यात येत आहेत. आगामी काळात आणखी मोठ्या कारवाया उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. माओवाद्याच्या डम्पमधून एक एके-४७ रायफल, दोन एसएलआर रायफल, एक कोल्ट आॅटोमोटिव्ह पिस्टल, एक १२ बोअर रायफल, एक क्लेमोर माईन, तीन एक एके-४७ मॅग्झीन, नऊ एसएलआर मॅग्झीन, एक इंसास मॅग्झीन, एसएलआर राऊंड १८७, एके ४७ राऊंड ५८, इंसास राऊंड १५, रायफल राऊंड ३५ नग, ८ एमएम राऊंड १२, कोल्ट आॅटोमोटिव्ह पिस्टल ४५ राऊंड १४ नग, बीजीएल ४, सुरका शेल्स १०, सुरका लाँचर राऊंड १०, स्फोटक पदार्थ अंदाजे ८.५ किलो, डेटोनेटर, कॉर्डेक्स वायर, वॉकीटॉकी, सोलर प्लेट, बॅटºया, कलर प्रिंटर व इतर महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *