गोंदियात बिबट्या आला…. रे….. आला…

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- चार दिवसा आधी एका चार वर्षीय मुलाला त्याच्या घरच्या मागे आई वडिला सोबत चुली जवळ बसलेल्या त्या चार वर्षीय मुलाला बिबट्याने आई च्या डोळ्यादेखत नेल्याची दुदैवी घटना घडली असुन हि घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील खडकी (डोंगरगाव) येथे घडली त्या नंतर गोंदिया शहरात सुद्धा अनेक ठिकाणी बिबट्या दिसत असल्याचे फोटो मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत.

या मुळे गोंदीप्य शहरात एक भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, तर काही ठिकाणी वाघ आल्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर वायरल होत असल्याचे समोर आले आहे. या वायरल होत असलेल्या फोटो मुळे अनेकांनी तर वन विभागाला फोन करून सूचना दिल्या, तर अनेकांमध्ये सायंकाळ होताच घरातून बाहेर जाण्याची भीती निर्माण होत आहे. गोंदिया शहरातील गौतम नगर, सूयार्टोला, मुर्री, जितेश चौक छोटा गोंदिया, अश्या अनेक ठिकाणी बिबट्या दिसल्याचे फोटो व्हायरल होत आहेत. त्यामुळे गोंदिया शहरातदहशतीचे वातावरण निर्माण होत आहे, तर अनेक लोकांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा निर्माण होत आहे. तर हे सगळे फोटो अक च्या माध्यमातून तयार करण्यात येत असल्याचे वन विभागा द्वारे सांगण्यात आले आहे.

बरेच फोटो अक च्या माध्यमातून

गोंदिया हा जंगलाला लागून असलेला वनपरिक्षेत्र परिसर आहे, त्यामुळे बिबट, वाघ, इतर प्राणी रहाण्याची शक्यता निश्चित आहे. परंतु ज्या पद्धतीने फोटो येत आहेत, एकच वेळी १० ते १५ फोटो येत आहेत. तर हे बरेच फोटो अक च्या माध्यमातून तयार करण्यात येत आहे. तर ज्या ठिकाणी बिबट्याचा फोटो आहे, त्याचठिकाणी वाघाचा देखील फोटो येत आहे, तर काही ठिकाणी चित्याचा फोटो येत आहे मात्र आपल्याकडे चिंता नाहीच अश्या प्रकारचे फोटो सोशल मीडियावर टाकले जात आहे. मात्र एखाद्या ठिकाणी वन्य प्राणी राहू शकतो त्या मुळे खºया गोष्टीकडे लक्ष न देता इतर चुकीच्या फोटोकडे लक्ष दिले जात असुन मोठ्या प्रमणात सोशल मीडिया वर हे व्हायरल होत आहे. त्या मुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार होत आहे. अश्या प्रकारे लोकं मध्ये भीती निर्माण होत असल्याने लोकांनी आपले काम धंदे बंद करू नये शेतात जाणे सोडू नये य यासाठी वन विभाग कडून गावागावात जाऊन जनजागृतीकरत असल्याची गोंदिया वन परिक्षेत्र अधिकारी माहिती दिलीप कौशिक यांनी दिली.

बिबट्याच्या हल्यात ९ ववर्षीय मुलीचा मृत्यु

काही दिवसांपूर्वी तिरोडा तालुक्यातील इंदोरा निमगाव येथे रुची हि तिच्या वडिलांसोबत शेतात गेली असता दरम्यान रुची पारधी ९ वर्ष या मुलीवर बिबट्याने हल्ला केला होता, त्या हल्ल्यात रुची गंभीर जखमी झाली होती. गोंदिया येथील एका खाजगी रुग्णलयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारा दरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेत मृत मुलगी वडिला सोबत शेतात गेली असता वडील शेतात काम करत होते मुलगी शेतात उभी असताना बिबट्याने अचानक मुलीवर हल्ला केला मुलीने आरडा ओरडा केला असता मुलीचे वडील व शेताच्या आजूबाजूला काम करत असणाºयांनी धाव घेतली असता बिबट्याने त्या मुलीला सोडून जंगला कडे पळाला बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या रुचीला गोंदिया येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *