
भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : शेतकºयांसाठी वरदान ठरलेल्या व शेतकºयांना सुजलाम् सुफलाम् करणाºया चांदपूर जलाशयाची कोट्यावधी रुपयाची थकबाकी आज सिहोरा व परिसरातील शेतकºयांकडे अडून असल्याचे वृत्त पुढे आले आहे. ही थकबाकी फक्त खरीप धान पिकाची असून रबी (उन्हाळी) धान पिकाच्या थकबाकीचा प्रश्न वेगळा असल्याचे समजते. सदर थकबाकीसाठी चुक कुणाची शेतकºयांची, पाणी वाटप संस्थांची की, पाटबंधारे विभागाची, असा प्रश्न आज उपस्थित होतो आहे. इंग्रज कालीन चांदपूर जलाशय हा आज ग्रीनवेली चांदपुर म्हणून ओळखला जात आहे. भंडारा जिल्ह्यात हा दुसºया क्रमांकाचा जलाशय असून गोसेखुर्द हा प्रथम क्रमांकात मोडल्या जातो आहे.
चांदपुर जलाशय हा १५ ते २० गावच्या शेत शिवारात विस्तारल्या गेला आहे. या जलाशयाला डावे आणि उजवे असे दोन कालवे आहेत. या कालव्याद्वारे चुल्हाड, बपेरा, सिहोरा व येरली जिल्हा परिषद क्षेत्रातील ५२ गावातील शेतकºयांच्या धान पिकाला पाणी पुरविल्या जात आहे. यात अंदाजे ९ हजार हेक्टर शेती ओलिताखाली असल्याचे वृत्त आहे. चांदपूर जलाशयातील पाणी शेतकºयांच्या धान पिकाला सोडण्यात यावे अशी शेकºयाची अपेक्षा वजा ओरड ही नित्याचीच बाब असते. चांदपूर जलाशयात पाणी अपुरे असल्यास सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचे पाणी वळते करावे, अशी मागणी केली जात असते. पाणी सोडण्यात आले नाही तर आंदोलनाचा इशारा दिला जातो. परंतु विज बिल,देखभाल व कालवे दुरुस्ती आणी कर्मचारी वर्गाचा खर्च कोणी करावा?, याचा विचारच केला जात नाही.
हा एक परिसरातील शेतकºयासाठी चर्चेचा विषय होऊन बसला आहे. चांदपुर जलाशय व कालवे हे पाटबंधारे विभागाच्या नियंत्रण व देखरेखीखाली आहेत. प्राप्त माहितीनुसार आज शेतकºयांकडे अंदाजे ६ ते ७ कोटी रुपयाच्या घरात थकबाकी असून दरवर्षाला शेतकºयावर आकारण्यात येणारा पानसारा हा ४० ते ४५ लाख रुपया पर्यंत असल्याचे वृत्त पुढे आले आहे. तर उन्हाळी धान पिकासाठी आकारण्यात येणारा पानसारा हा शेतकºयांच्या मागणी प्रमाणे आकारण्यात येत असल्याचेही सांगितले जात आहे.