रस्त्याच्या मागणीसाठी सिल्ली येथील महिलांनी गाठले थेट जिल्हाधिकारी कार्यालय

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिल्ली : तालुक्यातील सिल्ली (आंबाडी ) येथील वार्ड क्रमांक-१ मधील ग्रामस्थ अनेक वर्षांपासून पावसाळ्यात बिकट परिस्थितीत जीवन काढत असून नादुरुस्त चिखलाने माखलेले रस्ते आणि रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे सूक्ष्म जीव व चिखलामुळे होणारा त्रास सहन करत आहेत. त्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अनेक वेळा तोंडी मागणी करून आश्वासना शिवाय काहीच मिळाले नाही, म्हणून संतापलेल्या महिलांनी बुधवार दि. ८ एप्रिल रोजी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून आपली कैफियत त्यांच्यापुढे मांडल्या. तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती आणि भंडारा गोंदिया लोकसभा खासदार प्रशांत पडोळे, आमदार नरेंद्र भोंडेकर यांनाही पक्के रोड निर्माण करून देण्यासाठी निवेदन सादर केले आहे.

सिल्ली ग्रामपंचायत पदाधिकारी यांना वॉर्ड क्र. १ च्या रस्त्याची दुर्दशा माहित असून लहान मुले आणि म्हाताºयांना होणाºया त्रासाची माहित असतांना देखील सिल्ली ग्रामपंचायत पक्का रस्ता बांधकामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप आहे. सिल्ली येथील वार्ड क्रमांक- १ मधील रहवासी असलेल्या ग्रामस्थांच्या घरासमोरील रस्त्याची दुरावस्था लक्षात घेता, ग्रामपंचायत कार्यालयाला अनेक वर्षांपासून वारंवार मागणी करूनही तब्बल २५ वर्षापासुन रस्ता बनवुन देण्याची मागण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आता पर्यंत पक्का रस्ता बनवुन दिला नाही. तात्पुरत्या समाधानासाठी ग्रामपंचायत कार्यालय सिल्ली हे पावसाळयात केवळ मुरुम टाकुन देतात. त्यामुळे उलट पावसाळयात मुरुमामुळे चिखल तयार होते.व ग्रामस्थांना जाण्यायेण्याचा किंवा दुचाकी व चारचाकी वाहने नेण्यास अडचण निर्माण होत असते.

करीता योग्य मार्गाने मौका चौकशी करुन ग्रामस्थांना जाण्यायेण्यासाठी पक्का रस्ता बनवुन देण्यात यावे अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे, भंडारा विधानसभा आमदार नरेंद्र भोंडेकर, तहसिल कार्यालय भंडारा यांना देण्यात आला. यासाठी सिल्ली येथील वार्ड क्रमांच १ मधील रहिवास सौ. वनिता राजकुमार पडोळे, कुसुम रामेश्वर शेंडे, गिता बागडे, सुषमा शेंडे, निता बावणे, सौ. सविता देशमुख, सौ.रानू जितेंद्र क्षिरसागर, रेखा बालपांडे यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून जिल्हा प्रशासन व राजकीय पुढारी यांना मागणीचे निवेदन दिले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *