सिहोरा परिसरात बिना रॉयल्टी मुरुमाचा महापुर

भंडारा पत्रिका/वार्ताहर सिहोरा : सिहोरा परिसरात बिना रायल्टी मुरुमाचा महापुर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे. महसूल व वन विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे बोलले जात आहे. वारंवार तक्रार करूनही अधिकारी दखल घेत नसल्याचा प्रकार पुढे आला आहे. रायल्टी कमीची व उत्खनन अधिकचा होत असल्याचे सांगितले जात आहे. हा प्रकार सिहोरा, मुरली ते गोबरवाही व चांदपूर ते गोंदेखारी रस्त्यावर धडाक्यात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. नियमाप्रमाणे शासकीय कामात रॉयल्टी काढणे बंधनकारक आहे. परंतु रॉयल्टी वाचविण्यासाठी अवैधरित्या उत्खनन करून अवैधरित्या मुरमाचा उपसा करीत आहेत, यात रॉयल्टी वाचविण्यासाठी मुरूम ऐवजी मलमाही सोडण्यात येत असल्याचा प्रकार पुढे आला आहे.

महसूल विभाग व वन विभागाला याची कुणकुण लागू नये म्हणून दिवसा ऐवजी रात्रीला उत्खनन केल्या जात असल्याचीही माहिती पुढे आली आहे. वनविभाग व राजस्व विभागाच्या अधिकाºयांनी या प्रकरणाची दखल घ्यावी व सत्य काय ते शोधावे अशी नागरिकांची मागणी आहे. अवैधरित्या होत असलेल्या या उत्खननामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल पाण्यात बुडत असल्याचे नाकारता येत नाही. एकेकाळी मुरूम माफिया असोत की, रेती माफिया असोत, हे वन विभाग, महसूल विभाग व पोलीस प्रशासनाच्या निगराणीत असायचे. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. महसूल विभाग, वनविभाग व पोलीस विभागाचे अधिकारी हे मुरूम माफियांच्या निगराणीत आहेत व हा सर्व प्रकार नाना मामु व हप्ता वसुलीचा तर नाही ना असाही संशय व्यक्त केल्या जात असून रस्ता बांधकामाच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *