पवनीतील सावकार दांपत्याची दादागिरी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : भंडारा जिल्ह्यात बेकायदेशीर सावकारीविरोधात कारवाई करत पोलिसांनी धमक्या देऊन व्याज वसूल केल्याप्रकरणी सावकार दांपत्याविरुद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. हा प्रकार पवनी येथे उघडकीस आला. संदेश खोब्रागडे (४०) आणि रेखा खोब्रागडे (३२) अशी या अवैध सावकार दांपत्याची नावे आहेत. पोलिसांच्या मते, या दाम्पत्याने १० टक्के व्याजदराने पैसे उधार देऊन आर्थिक शोषण केले. मूळ रकमेपेक्षा जास्त रक्कम वसूल करूनही कर्जदारांना धमकावल्याची गंभीर बाब तपासात पुढे आली आहे.

पवनी येथील रामपुरी वॉर्डमधील रहिवासी तक्रारदार विशाखा नागपुरे (४४) यांनी पाच वर्षांपूर्वी रेखा खोब्रागडे यांच्याकडून ३ लाख ५० हजाररुपयांचे कर्ज घेतले होते. १० टक्के व्याजदराने हा व्यवहार ठरला होता. नागपुरे यांनी आतापर्यंत व्याजासह एकूण १३ लाख ८० हजार रुपये परत केले. तरीही, रेखा खोब्रागडे यांनी नागपुरे यांच्या घरी जाऊन तिला शिवीगाळ केली आणि तिच्यावर घरातील वस्तू फेकून मारल्या. पवनी पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल झाल्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १५२ आणि ३५१(२) आणि महाराष्ट्र सावकारी कायदा २०१४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक प्रीतम येवले या प्रकरणाचा तपास करत आहेत. नागरिकांचे पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *