महिलांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी महिला मेळाव्याची आवश्यकता – डॉ.निर्मला राजहंस

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदुर : विविध कार्यक्रमाच्या माध्यमातुन महिलांना स्वत:च्या कलागुणांना व कर्तृत्वाला सिध्द करण्याची संधी प्राप्त होते. शासनाच्या विविध योजना, तसेच मार्गदर्शन, महिलांच्या सुरक्षा व विकासासाठी अस्तित्वात असलेले कायदे व नियमांची माहिती तसेच महिलांमध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण करण्यासाठी महिला मेळावा आयोजित करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन डॉ. निर्मला राजहंस यांनी केले. नगर पंचायत लाखांदूर तर्फे दि. १७ जानेवारी २०२६ रोजी आशीर्वाद मंगल कार्यालय लाखांदूर नगर पंचायत लाखांदूर तर्फे महिला मेळावा उत्साहात येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करतांना बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. निर्मला राजहंस होत्या तर प्रमुख वक्ते म्हणून डॉ. इंन्द्रायनी राउत, डॉ. रोशनी ठाकरे, डॉ. ममता राऊत, डॉ. मेघा कावळे, डॉ. मोतीलाल कावळे उपस्थित होते.

मेळाव्याचे उद्घाटन लाखांदुर नगर पंचायतचे अध्यक्ष विनोद ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला मेळाव्यात उपस्थित महिलांच्या आरोग्य विषयक महत्त्वाच्या मुद्यांवर महिलांना मार्गदर्शन करण्यात आले तसेच उपस्थित सर्व महिलांना उपहार साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन नगरसेविका वेनु कोटरंगे यांनी केले तर आभार सभापती नलीनी खरकाटे यांनी मानले . मेळाव्याला मुख्याधिकारी आशीष घोडे, उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, नगरसेवक सुरेश नागपुरे, रिजवान पठाण, चुन्नीलाल नागमोती, निखील सुखदेवे, विनोद बळी, कांचन गहाणे, मुकेश सहजवाणी, नगरसेविका नीलम हुमणे, लोभा शिलार, प्रिया धाकडे, सोफिया पठाण, लता कुडेगावे, निशा बगमारे वैशाली बगमारे, विद्या गराडे व सर्व कर्मचारी यांसह शहरातील महिला उपस्थित होत्या.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *