
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : घरकुल बांधकाम करणाºया लाभार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाच्या ३० एप्रिल २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार, प्रधानमंत्री आवास योजना तसेच इतर शासकीय घरकुल योजनांतील लाभार्थ्यांना ५ ब्रासपर्यंत मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय अंमलात आणण्यात आला आहे. त्यानुसार तुमसर तालुक्यातील ११ अधिकृत रेतिघाटांवरून घरकुल लाभार्थ्यांना वाळू देण्यात येणार आहे. तुमसर तालुक्यात जवळपास ४८०० लाभार्थी ची यादी पंचायत समिती, तुमसर कडून प्राप्त आहे.