नागपूरहून परतताना कारचा भीषण अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी बेला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथील जल्लोष पाहून गावी परतणाºया तरुणांच्या कारला भंडारा पोलिस स्टेशन हद्दीत बेला जवळ भीषण अपघात झाला. अनियंत्रित कार पलटल्याने या अपघातात अड्याळ परिसरातील सोनू उर्फ चंद्रकांत डोंगरे या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याचे अन्य चार मित्र गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे तिर्री आणि अड्याळ परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्टेटस ठरले शेवटचे; आनंदावर विरजण मिळालेली माहिती अशी की, अड्याळ जवळील तिर्री गावात सोमवारी रात्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य रॅली काढण्यात आली होती.

ही रॅली आणि गावातील जेवण आटोपून सोनू उर्फ चंद्रकांत डोंगरे आपल्या पाच मित्रांसह अल्टो कारने नागपूर येथील मुख्य सोहळा पाहण्यासाठी रात्री १० ते १०:३० च्या दरम्यान रवाना झाला होता. मात्र, गावी परतत असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. अपघातातील जखमींची नावे बेला जवळ झालेल्या या भीषण अपघातात कारमधील अन्य चार मित्र गंभीर जखमी झाले आहेत. यात साजीद मुस्तफा पठाण ( १८, रा. अड्याळ), क्रिश भिवाजी जिभकाटे ( १९, रा. चिचाळ), अभिषेक दीपक बंसोड (३०, रा. तिर्री) – हा मृत सोनूचा मामेभाऊ असल्याचे समजते., आयुष भास्कर कावळे ( २४, रा. तिर्री) यांचा समावेश आहे. गावात शोककळा; ग्रामस्थांची रुग्णालयात धाव अपघाताची बातमी वाºयासारखी तिर्री आणि अड्याळ परिसरात पसरली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे धाव घेतली. जयंतीच्या उत्साहात मग्न असलेल्या गावावर या घटनेमुळे अचानक शोककळा पसरली आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *