वाघाच्या हल्ल्यात जखमी महिलेचा मृत्यू

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : तालुक्यातील उमरझरी येथे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या माया रामकृष्ण सोनवणे (वय ५०) यांचा १ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या काही दिवसांपासून वारंवार होत असलेल्या वाघांच्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने २ एप्रिल रोजी उमरझरी येथे सोनवणे यांच्या घरी भेट देत कुटुंबीयांना तात्काळ १० लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.

माजी जिल्हा परिषद सदस्य नेपाल रंगारी यांच्या नेतृत्वात मागणी संबंधी चर्चा करण्यात आली व त्यानुसार, उर्वरित १५ लाख रुपये लवकरच देण्याचे, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्याचे आणि आंदोलना दरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याचे लेखी आश्वासन अधिकाºयांनी दिले. यावेळी एसीएफ नागझिरा विपिन लांडगे, एसीएफ कोका सुहास कांबळे, एसीएफ उमरझरी शोएब रिजवी यांच्यासोबत डीवायएसपी शिवम विसापूरे थानेदार महादेव आचरेकर पालांदूर चे ठाणेदार सतीश बनसोड व संबंधित वनाधिकारी व पोलीस अधिकारी, तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी नेपाल रंगारी, माहेश्वरी नेवारे आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान, हल्ला करणाºया वाघिणीला दोन दिवसांत जेरबंद करण्याचे ठोस आश्वासनही वनविभागाने दिले आहे. मात्र, दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नाही तर दोन दिवसांनंतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी दिला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे मोठे वाघाला जेरबंद करण्यासाठी वनाधिकाºयांसह जवळपास १२५ वन कर्मचारी युद्ध स्तरावर प्रयत्न करीत आहेत यामध्ये चार शार्प शूटर ची टिम, ड्रोन , पिंजरे या साहित्यासह एन एन टी आर च्या चमु सोबत भंडारा वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *