
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी पालांदूर: पोलिस ठाण्याचे हद्दीत अवैध रेती वाहतूकीवर कारवाई करण्याकरिता स्थानिक पालांदूर येथील पोलीस पट्रोलिंग करीत असताना एक लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर व विना क्रमांकाच्या लाल रंगाच्या ट्रॉलीने चुलबंद नदीच्या मºहेगाव पात्रातून विना परवाना विना पास रेतीची अवैद्य वाहतूक करतांना बुधवारी (ता.१ एप्रिल) रोजी स.९.३० वाजता दरम्यान मिळून आल्याने ट्रॅक्टर चालकावर पालांदूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत ३ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव कैलाश दौलत ब्राह्मणकर (४४वर्ष) रा. मºहेगाव ता.लाखनी असे आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी अवैध धंद्यावर अंकुश लावण्याकरिता जिल्हयातील सर्वच पोलिस ठाण्यातील कर्मचाºयांना आदेश निर्गमित केले आहेत.त्यानुसार जिल्हाभरातील सर्वच पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांची पेट्रोलिंग अहोरात्र सुरू आहे.बुधवारी सकाळच्या सुमारास पालांदूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मºहेगाव परिसरात पोलीस कर्मचारीं पेट्रोलिंग करीतअसताना स.९.३० वाजता दरम्यान ट्रॅक्टर चालक/मालक कैलाश दौलत ब्राह्मणकर हा लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर क्र.एम.एच.३६ एल.५४७६ व सोबत जोडलेली लाल रंगाची विना क्रमांकाची ट्रॉली व एक ब्रास रेती असा एकूण ३ लाख ६ हजार रुपयाचा मुद्देमाल पंचासमक्ष घटनास्थळावरून जप्त करून अवैध व विना परवाना विना पास रेती वाहतूक करून शासनाचा महसूल बुडवितांना मिळून आल्याने पालांदुर येथील पोलीस ठाण्यातील कर्मचारी पो.हवा. सतिश पुराम यांच्या फिर्यादीवरून पालांदूर पोलिसांनी ट्रॅक्टर चालक/मालक विरुद्ध अपराध क्रमांक ८५/२०२६ कलम ३०५(ई),भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस ठाणे पालांदूरचे ठाणेदार सतीश बन्सोड यांचे मार्गदर्शनात सुरू आहे.