
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर तालुक्यातील पिंपळगाव/ कोहळी येथे १८ मार्च रोजी आरोपी प्रथम ईश्वर कुडेगावे यांनी गावातीलच तीन अल्पवीयन मुलीला चारचाकी वाहनाने फिरवून आणतो म्हणून बहाना केले. व जंगल परिसरात नेले. त्यापैकी एका ११ वर्षीय मुलीवर व दोन्ही मुलीच्या समक्ष अतिप्रसंग केला. दोन मुलींनी आरडाओरडा व विरोध करण्याचा प्रयत्न केला. असता आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली व बाहेर किंवा घरी सांगितले तर खबरदार अशी धमकी दिली होती. सदर घटना घडल्याच्या दोन ते चार दिवसानंतर पीडित मुलीला त्रास व्हायला लागला, आई-वडिलांनी मुलीला याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता घडलेला प्रसंग मुलीने आईला सांगितला व मुलीच्या सांगण्यावरून पीडिताच्या वडिलांनी तात्काळ लाखांदूर पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दाखल केले.
घटनेची गांभीर्य बघून आरोपीवर पोस्को कायद्यांतर्गत विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यावेळी संघटनेच्या महिलांनी या आरोपीची सखोल चौकशी करून आरोपी कायद्याच्या पळवाटाने मोकाट सुटणार नाही यांची योग्य खबरदारी घेऊन आरोपीस कठोर शिक्षा मिळेल अशा पद्धतीने न्यायालयासमोर आरोप पत्र सादर करावे व अल्पवयीन पिडीत बालिकेश योग्य असे न्याय देण्यात यावे. या मागणीसाठी २७ मार्च रोजी महाराष्ट्र राज्य महिला अधिकार सामाजिक संघटनेतर्फे तहसीलदार व पोलीस स्टेशन लाखांदूर येथे निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष निरु मेश्राम, पूर्व विदर्भ महिला अध्यक्ष ज्योती रामटेके, भंडारा जिल्हा उपाध्यक्ष अर्पणा जांगडे, नगरपंचायत नगरसेविका निशा बगमारे, वर्षा कोरे, जयश्री शेंडे, सविता लेदे व संघटनेच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.