
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखांदूर : लाखांदूर शहरातील वार्ड क्रमांक ३ मध्ये कुटुंबियासह पुष्पदास मेश्राम यांचे घर झुडपी जंगल परिसरात असून रात्री ८ वाजता सुमारास बिबट्याचा दर्शन घडुन आले . व त्यांच्या पाळीव प्राणी कुत्र्यावर हल्ला करून जखमी केले. पुष्पदास यांना कुत्र्याचा आवाज आल्याने लगेच कुटुंबियासह घराच्या बाहेर पडताच त्यांना वनप्राणी बिबट दिसल्याने आरडाओरड केल्याने बिबट जंगलाकडे पळ काढला, वार्ड क्रमांक ३ आजूबाजूला नागरिकांकडे म्हैस. गायी. शेळ्या व पाळीव प्राणी असल्यामुळे कधीही बिबट्यांचे दर्शन घडत राहत असतात. बिबट्याचा बंदोबस्त करण्यात यावे यासाठी लाखांदुरचे वन विभाग वनपरिक्षेत्र अधिकारी चन्ने यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी नगरपंचायत चे गटनेते बबलू नागमोती, नगरसेविका लोभाताई शिलार,सामाजिक कार्यकर्ते जगदीश बगमारे,पुष्पदास मेश्राम, बाळू शिलार, विनोद भुते,जोगेंद्र मेश्राम, मुकेश नागापुरे, नीलकंठ भुते, होमकांत नागपूरे,प्रभाकर कार राजू कडीखाये, लोचन ठाकरे प्रभू भावे,किशोर बगमारे व नागरीक उपस्थित होते .