कारच्या धडकेत तरुण ठार,२ गंभीर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील खापाखरबी राष्ट्रीय महामार्गावर धुलीवंदनाच्या दिवशी ३ मार्च रोजी दुपारी एका भीषण अपघाताने परिसर हादरून गेला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका २९ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, अवघ्या तीन दिवसांनंतर मृत युवकाचा वाढदिवस होता, मात्र त्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातल्याने खरबी गावावर शोककळा पसरली आहे. सदर अपघातात प्रशांत पुरूषोत्तम कांबळे (२९) रा.खरबी हा जागीच ठार झाला तर विकास अशोक गोमासे (२८) व भुषण गजानन सिंगनजुडे (२८) रा. खरबी हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना भंडारा येथीलरूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

प्रशांत कांबळे हा ३ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी दुपारच्या सुमारास आपल्या दोन मित्रांसह दुचाकीने गावाकडे परत येत असताना खरबी शिवारातील ढाब्यासमोर येणाºया भरधाव कारने क्रमांक एमएच ३५ ऐजी ८११७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्या अपघातात प्रशांतचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवर मागे बसलेले विकास अशोक गोमासे व भूषण गजानन सिगंनजुडे हे दोघे मित्र गंभीर जखमी झाले. सदर घटनेचा मोहाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह शोकाकुल वातावरणात नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. मृतक प्रशांतच्या मृतदेहावर खरबी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे, उपनिरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस करीत आहेत.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *