
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया मौजा देवनारा ते कुरमुडा परिसरात पोलिसांनी कारवाई केली आहे. बावनथडी नदी पात्रातून विनापरवाना अवैध रेतीची चोरी करून वाहतूक करणाºया स्वराज कंपनीच्या ट्रॅक्टरसह ८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गिते व त्यांचे पथक पेट्रोलिंगवर असताना त्यांनी मौजा कुरमुडा ते देवनारा जाणाºया कालव्याच्या (नहर) पाळीवर सापळा रचला.
यावेळी एक निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ७३५ ट्रॅक्टर (क्र. एमएच ३६ एजी ८०३५) रेती भरून येताना दिसला.पोलिसांनी गाडी थांबवून चौकशी केली असता, चालक संजय ग्यानीराम सरयाम (वय ३०, रा. विटपूर) याने सांगितले की, तो मालक देवीदास माधोराव गौपाले (रा. कुरमुडा) यांच्या सांगण्यावरून बावनथडी नदी पात्रातून विनापरवाना रेतीची वाहतूक करत आहे. या कारवाईत पोलिसांनी ६,००० रुपये किमतीची १ ब्रास रेती आणि ८,५०,००० रुपये किमतीचा विना क्रमांकाच्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर, असा एकूण ८ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आरोपी चालक व मालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२), ४९ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (८) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८८ च्या कलम ७, ९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर कारवाई ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती गिते, पोलीस हवालदार गौरीशंकर कडव व त्यांच्या पथकाने केली असून, पुढील तपास सुरू आहे.