
सिहोरा : चांदपूर देवस्थान हे भंडारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण विदर्भात प्रसिद्धीस आहे. या चांदपुर देवस्थानच्या पावन तपोभूमीत रक्त रंजीत प्राण घातक हल्ला होईल याची कोणी कल्पनाही केली नसेल परंतु हे सत्य आहे. ही घटना १९ मे रोजी रात्री ८.५० च्या सुमारास घडली असून या घटनेची तक्रार जखमी फिर्यादी भावेश हरिचंद धंधुकीया वय ४० वर्ष लाखनी यांनी पोलीस स्टेशन सिहोरा येथे दिली असून आरोपी विरुद्ध अ.क्र.२२२/ २०२६ कलम ११८(१),३५२ भा.न्या. संहिता २०२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चांदपूर देवस्थानात घडलेल्या या भ्याड हल्ल्याची सर्वत्र निंदा होत आहे.तर चांदपूर देवस्थानात घडलेल्या या निंदनीय व अशोभनीय कृत्याचा निषेध व्यक्त केल्या जात आहे.
फिर्यादी भावेश हरिचंद धंधु किया माहितीचा अधिकारअंतर्गत जिल्हाध्यक्ष असल्याचे उल्लेखित आहे. सविस्तर वृत्त असे, फिर्यादी जखमी चे काका किशोर गिरधारीलाल धंधुकीया जवाहर नगर यांनी आपल्या घराच्या सुंदर कांड कार्यक्रमाचे आयोजन चांदूर येथे केले होते. धंधुकीया परिवारासह काही नातेवाईक सुद्धा होते. सुंदर कांड कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार यातच आरोपी दीपेन व त्याचा भाऊ जितेन रजनीकांत धंधुकीया यांच्यात प्रॉपर्टी संबंधात वाद सुरू झाले असता फिर्यादी भावेश हरिचंद्र धंधुकिया यांनी मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला.आपसातील वाद घरी मिटवा या धार्मिक कार्यक्रमात विघ्न आणू नका असे म्हणताच आरोपी दिपेन यांनी शिवीगाळ करून त्याच्या हातात असलेल्या धारदार शस्त्राने डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला मारून जखमी केले.जखमी अवस्थेत असतांनाच १०८ नंबर डायल करून सिहोरा पोलिसांना माहिती दिली.ठाणेदार विजय कसोधन यांनी घटनास्थळ गाठले. फिर्यादीची तक्रार व डॉक्टरांच्या प्राथमिक अहवाला वरून आरोपी दिपेन रजनीकांत धंधुकीया वय ४५ वर्ष यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करून तपासात घेतला आहे.