एसटी बसच्या चाकाखाली आल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू

तालुका प्रतिनिधी/ भंडारा पत्रिका मोहाडी : प्राप्त माहीतीनुसार मोहाडी तालुक्यातील हरदोली झंझाड येथील आपल्या मामीला घेऊन गावाकडे जात असलेल्या तरुणाचा दुचाकीवरील संतुलन बिघडल्याने त्याचा हिरकणी एस.टी.बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला तर मामी दुसºया बाजूला पडल्याने जखमी झाली.ही हृदयद्रावक घटना सोमवार दि.१ जून २०२६ ला सकाळी १०.१५ वाजता मोहाडी येथील बायपास रोडवरील विठ्ठलरुक्मिणी मंदिरासमोर घडली.मोहाडी तालुक्यातील आकाश प्रकाश कटबर्ये २६ वर्ष रा.हरदोली( झं.)असे मृतकाचे नाव आहे.

मृतक युवकाचे मामा मनोज कुर्वे रा.हरदोली(झं.)यांचे भावा-भावामध्ये झाड तोडण्यावरून भांडण झाले होते त्याची तक्रार करण्याकरिता आकाश आपल्या मामी अनिता मनोज कुर्वे (४०) सोबत मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये आला होता. तक्रार करून परत गावी जातानातुमसर-भंडारा राज्य मार्गावर विठ्ठलरुक्मिणी मंदिरासमोर एका अझात भरधाव दुचाकी स्वाराने त्याला कट मारल्याने आकाशच्या दुचाकीचा संतुलन बिघडले.त्यामुळे मामी अनिता दुचाकी वरून खाली पडल्या आणि आकाश समोरून येणाºया एसटी महामंडळाच्या हिरकणी बस क्र.एम एच ०६/बी डब्ल्यू १४३ च्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

हिरकणी ही बस तुमसरकडून नागपूरकडे जात होती.त्याचवेळी तिथून जात असलेल्या पोलीस वाहन चालक पृथ्वीराज राठोड यांनी लगेच तेथे उपस्थित युवकांच्या मदतीने जखमी आकाश व त्याची मामी अनिता यांना उचलून ग्रामीण रुग्णालयात नेले.परंतु डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले. अनिता कुर्वे यांच्या डोक्याला मार असल्याने त्यांना शास्- ाकीय जिल्हा रुग्णालय भंडारा येथे रेफर करण्यात आले आहे. घटनास्थळी हौशी नागरिकांच्या मोठा जमाव तयार झाला होता.परिस्थिती चीघळू नये म्हणून पोलीस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांच्या नेतृत्वात पोहवा दुर्योधन भुरे,सुदेश लांजेवार,कल्पना फड,ज्योत्सना सुरेश बाणासुरे या पोलीस कर्मचाºयांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

चरण वाघमारे यांची ग्रामीण रूग्णालयात धाव

घटनेची माहिती मिळताच माजी आमदार चरण वाघमारे यांनी तात्काळ शासकीय रुग्णालय मोहाडी येथे धाव घेत मृतकाच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून संपूर्ण घटनेची माहिती जाणुन घेत धीर दिला. यावेळी त्यांनी शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाºयांशी चर्चा करून मृतकाच्या कुटुंबाला शासनाकडून मिळणारी सर्वतोपरी मदत, आर्थिक सहाय्य तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी रवींद्र बाभरे (संचालक, कृषि उत्पन्न बाजार समिती तुमसर), पंचायत समिती सदस्य कैलास झंझाड, रक्षक उचिबगले, यशकुमार राहुल, माजी सरपंच अर्जुन उइके (देऊळगाव) तसेच माजी सरपंच अंकुश दमाहे (सिरसोली) आदि उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *