कॉंग्रेसची उमेदवारी ह्यगुलदस्त्यातह्ण; दिलीप बंसोड,प्रफुल अग्रवाल, नरेश ईश्वरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भंडारा : विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील निवडणुकीसाठी कॉंग्रेसतर्फे आज तीघांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.त्यामध्ये माजी आमदार दिलीप बंसोड, प्रफुल अग्रवाल व नरेश ईश्वरकर या तिघांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. यावेळी कॉंग्रेसचे नेते आ.नाना पटोले,खा.प्रशांत पडोळे, माजी आ.गोपाल अग्रवाल यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. भंडारा – गोंदिया विधान परिषदेची काँग्रेसची उमेदवारी कोणाला जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजारा लागल्या असताना आज नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेसने त्यांच्या उमेदवाराची अद्याप घोषणा केलेली नाही. उमेदवाराचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे.

४ जूनला महाविकास आघाडीच्या उमेदवाराचे नाव स्पष्ट होणार असल्याचे काँग्रेस नेते आ. नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. काँग्रेस पक्षाकडून गोंदियाचे माजी आमदार दिलीप बनसोड हे मुख्य उमेदवार असुन त्यांच्या सपोर्टेड प्रफुल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल करीत असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली. नेमका काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? याबाबत ४ जूनला चित्र स्पष्ट होईल, असे संकेत नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिले. महाविकास आघाडीकडून नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिवशीही अधिकृतरित्या कुठल्याही उमेदवाराची घोषणा न झाल्याने आता मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाली आह

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *