भाजपतर्फे अविनाश ब्राह्मणकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

भंडारा : भंडारा-गोंदिया विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी भाजपतर्फे सोमवारी दि.१ जून रोजी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यानिमित्त भंडारा येथील लक्ष्मी सभागृहात आयोजित सभेला महायुतीच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल पटेल यांनी संबोधित करताना महायुतीच्या उमेदवाराला विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील विद्यमान तसेच माजी आमदारांनीही कार्यकर्त्यांना एकजुटीने निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आवाहन केले.सभेनंतर महायुतीच्या नेत्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा येथे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उमेदवाराला पाठिंबा दर्शविला. यावेळी आमदार परिणय फुके, माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार राजकुमार बडोले, आमदार विजय रहांगडाले, आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार विनोद अग्रवाल, आमदार संजय पुराम, जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर,राकॉं जिल्हाध्यक्ष नाना पंचबुध्दे,प्रदेश महासचिव धनंजय दलाल,माजी खासदार सुनील मेंढे यांच्यासह महायुतीतील घटक पक्षांचे वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *